Posts

Showing posts from April, 2020

अब्दूल जब्बार दर्जी यांचे निधन

Image
 अब्दूल जब्बार दर्जी यांचे निधन सोलापुर : मुस्लिम पाच्छा पेठ येथे राहणाऱ्या अब्दूल जब्बार दर्जी यांचा गुरुवारी सायंकाळी राहत्या अल्पशा आजाराने दुखंद निधन झाला, यांच्या पश्चात ७ भावंडे, तीन बहिणे, पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा मोठा परिवार आहे, समाजसेवक मौलाली दर्जी यांचे ते लहान भाऊ होते.

पोलिस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना महासंचालक पदक

Image
पोलिस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना महासंचालक   पदक सोलापूर (प्रतिनिधी) पोलिस दलात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलिस अधिकारी आणि कर्मचार्‍यांना राज्याच्या पोलिस महासंचालकांकडून दिला जाणारा महासंचालक  पदक  जाहीर करण्यात आला आहे.सन २०१९ मध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल ग्रामीण पोलीस दलातील पोलीस उपाधीक्षक अरुण सावंत यांच्यासह पाच जणांना पोलीस महासंचालक पदक गुरुवारी जाहीर करण्यात आले आहे.शहरातील जिल्ह्यातील अंत्यत क्लिष्ठ आणि बहुचर्चित गुन्ह्यांची उकल करणाऱ्या अधिकाऱ्यांना या पोलिस दलातील महत्त्वाच्या पदकाने सन्मानित करण्यात येते.अरूण साहेबराव सावंत,पोलीस उप-अधीक्षक (मुख्यालय),(सेवेत सतत १५ वर्षे उत्तम सेवाभिलेख )विश्वंभर भिमराव गोल्डे,पोलीस निरीक्षक, माळशिरस पोलीस ठाणे(सेवेत सतत १५ वर्षे उत्तम सेवाभिलेख ),महेश रमण क्षीरसागर,सहायक पोलीस उपनिरीक्षक, (सतत १५ वर्षे उत्तम सेवाभिलेख),नासिर रहीम शेख,सहायक पोलीस उपनिरीक्षक (सेवेत सतत १५ वर्षे उत्तम सेवाभिलेख)सुभाष सखाराम राठोड,पोलीस हवालदार ( सतत १५ वर्षे उत्तम सेवाभिलेेेख)यांना सन्मान चिन्ह मिळालेल्...

करोनाबाधित पत्रकाराच्या संपर्कात ४ मंत्री, 'सेल्फ क्वारंटाईन'चा निर्णय

Image
करोनाबाधित पत्रकाराच्या संपर्कात ४ मंत्री, 'सेल्फ क्वारंटाईन'चा निर्णय बंगळुरू : कर्नाटक सरकारच्या चार मंत्र्यांनी स्वत:ला क्वारंटाईन करण्याचा निर्णय घेतलाय. स्थानिक चॅनलचा एक व्हिडिओ जर्नलिस्ट करोनाबाधित असल्याचं आढळलंय. आपण त्याच्या संपर्कात आलो होतो, हे लक्षात आल्यानंतर हे मंत्री आपापल्या घरातच क्वारंटाईन झाले आहेत...सोशल मीडियावरून या मंत्र्यांनी ही माहिती दिली आहे. यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री डॉक्टर अश्वत नारायण यांचादेखील समावेश आहे.स्थानिक मीडियाचा एक व्हिडिओ जर्नलिस्ट २४ एप्रिल रोजी करोनाबाधित असल्याचं स्पष्ट झालं होतं. हा पत्रकार २१ ते २४ एप्रिलपर्यंत या मंत्र्यांच्या संपर्कात होता.उपमुख्यमंत्री डॉ.अश्वत नारायण यांच्याशिवाय राज्याचे गृह मंत्री बसवाराज बोम्मई, आरोग्य मंत्री डॉक्टर सुधाकर आणि पर्यटन मंत्री सी टी रवि यांनी स्वत:ला क्वारंटाईन केलंय. या चारही मंत्र्यांनी आपली करोना चाचणी करवून घेतलीय. या चाचणीचा निकाल 'निगेटिव्ह' आला आहे. परंतु, सावधानता म्हणून नियमाप्रमाणे १४ दिवसांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण करूनच बाहेर पडण्याचा निर्णय त्यांनी ट्विटर...

परीक्षेचे वेळापत्रक लवकरच जाहीर होईल: उच्च शिक्षणमंत्री

Image
परीक्षेचे वेळापत्रक लवकरच जाहीर होईल: उच्च शिक्षणमंत्री   मुंबई : विद्यापीठ,महाविद्यालय परीक्षा आणि शैक्षणिक वर्ष याबाबत विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक सूचना राज्य शासनाला प्राप्त झाल्या आहेत. आयोगाच्या प्राप्त सूचनांच्या अधीन राहून राज्यातील विद्यापीठ आणि महाविद्यालयांच्या परीक्षा घेतल्या जातील.येत्या दोन ते तीन दिवसांत परीक्षांचं वेळापत्रक जाहीर होईल, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज सांगितले.सामंत म्हणाले, 'पदवीच्या प्रथम आणि द्वितीय वर्षाच्या परीक्षा या १ जुलै ते १५ जुलै २०२० दरम्यान घेण्यात याव्यात तसेच बारावी नंतरचे प्रवेश लवकरात लवकर देऊन १ सप्टेंबर २०२० पासून नवीन शैक्षणिक वर्षाची सुरूवात करावी, असा सूचना आयोगाकडून प्राप्त झाल्या आहेत. परीक्षा आणि पुढील शैक्षणिक वर्ष याचे वेळापत्रक तयार करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीसोबत लवकरच व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून बैठक आयोजित करण्यात येणार आहे. या बैठकीत विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांवर सविस्तरपणे चर्चा करून राज्यातील परीक्षा आणि शैक्षणिक वर्ष याचा अहवाल त...

डिव्हीपी मार्ट आता अँप स्वरूपात प्रांताधिकारी सचिन ढोलेंनी केले अनावरण

Image
डिव्हीपी मार्ट आता अँप स्वरूपात प्रांताधिकारी सचिन ढोलेंनी केले अनावरण पंढरपूर प्रतिनिधी: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लाॅकडाऊन असल्याने नागरिकांना घराबाहेर पडता येत नसल्याने, डिव्हीपी मार्ट ने घरबसल्या मोबाईलवर मोफत ॲप डाऊनलोड करून वस्तू खरेदी करून घरपोच मोफत सेवा सुरू केली आहे.पंढरपूरमधील अग्रगण्य उद्योग समूह असणाऱ्या डिव्हीपी उद्योग समूहाच्या वतीने पंढरपूरमध्ये डिव्हीपी मॉल चालविला जातो.नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून सध्या घरपोच सेवा दिली जात आहे.नागरिकांना अत्यावश्यक वस्तूची गरज बघता डिव्हीपी मार्टचा ॲप डाऊनलोड करून सुविधेचा लाभ घ्यावा. व पुढील काळात प्रशासनाकडून येणाऱ्या वेळोवेळी सुचनेचे पालन करावे.आपण घरातच राहून आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी.असे आवाहन यावेळी या उद्योग समूहाचे प्रमुख अभिजित पाटील यांनी केले.

संत तुकडोजी महाराज जयंतीनिमित्त अभिवादन

Image
संत तुकडोजी महाराज जयंतीनिमित्त अभिवादन बार्शी दि (तालुका प्रतिनिधी) राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त बार्शी नगरपालिकेच्या वतीने नगराध्यक्ष असिफ तांबोळी यांचे हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी मुख्याधिकारी शिवाजी गवळी,पाणी पुरवठा सभापती भैय्या बारंगुळे ,मिळकत विभाग प्रमुख महादेव बोकेफोडे आदी उपस्थित होते

बेकायदेशीर बांधकाम बाबतीत प्रशासनाची प्रचंड उदासीनता

Image
बेकायदेशीर बांधकाम बाबतीत प्रशासनाची प्रचंड उदासीनता बार्शी दि (तालुका प्रतिनिधी) बावी (आ)ता बार्शी येथील त्या गुन्हा दाखल झालेल्या बेकायदेशीर बांधकाम बाबतीत संबंधित ग्रामपंचायत, आणि सार्वजनिक बांधकाम विभागा कडून प्रचंड प्रमाणात उदासीनता दाखवण्यात आले असल्याचे दिसून येत आहे.बार्शी -तुळजापूर रोडवर बावी फाट्यावर मागील काही महिन्यापासून हे बेकायदेशीर खाजगी बांधकाम सुरू होते संचारबंदी लॉक डाऊन काळातही हे बांधकाम अगदी राजरोसपणे सुरू होते मात्र तरीही संबंधित बावी ग्रामसेवक, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी,तलाठी अथवा पोलीस पाटील आणि गावपातळीवरील दक्षता समितीने याबाबत कोणतीही नोटीस सुद्धा दिली नसल्याची माहिती  विस्तार अधिकारी गायकवाड यांनी दिली आहे सदर बांधकाम सुरू असलेली कमान कोसळून दि १२ एप्रिल रोजी झालेल्या  अपघातात महेश भारत डोळज (२७ वर्षे) रा वैराग, विकास सुग्रीव वाळके ( ३२) रा. मानेगाव, दिपक संग्राम घोलप (३२) वर्षे रा दडशिंगे अशी  व्यक्तीचा मृत्यू झाला आहे याबाबत तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मात्र सदर बेकायदेशीर बांधकाम बाबतीत कमालीची उदासीनता दाख...

कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी महिलेच्या जिद्दीचा प्रवास

Image
कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी महिलेच्या जिद्दीचा प्रवास तुळजापूर  ( प्रतिनिधी ) आरोग्यासाठी अनेकदा आपण भेसळयुक्त पदार्थ व मसाला टाळतो,रासायनिक वापरामुळे स्वास्थ्य बिघडत चालले आहे, त्यामुळे घरगुती अन अस्सल कुठे काही मिळत का ते सतत शोधत असतो,पण असाच एक प्रयोग तुळजापूर तालुक्यातील आरळी बु येथील सौ.सुवर्णा मल्लिनाथ वैद्य या महिलेने केला आहे,घरगुती पध्दतीने या दैनंदिन लागणाऱ्या चटणी,लोणचे व मसाले बनवण्याचा आपला लहान उद्योग सुरु केला आहे.आरळी बु सारख्या गावात एस.एम.व्ही. मसाले या नावाने नोंदणीकृत असा घरगुती उद्योग आज सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे,आसपासच्या आठ दहा गावातील नागरिक मोठया संख्येने या प्रोडक्टचा वापर करत आहेत. नॅचरल व घरगुती पध्दतीने ही प्रोडक्ट बनवली जात आहेत,यात लाल तिखट,काळ तिखट, हळद पावडर,शेंगा चटणी,गरम मसाले, जिरा पावडर,हळद पावडर,धने पावडर, ज्वारी व भाजरीची कडक भाकरी,आंबा लोणचं,लिंबुचे लोणचे, हिरव्या मिरचीचे लोणचे,कारल्याचे लोणचे,ओल्या हळदीचे लोणचे,महालंगी लिंबू लोणचे असे ना कलर ना केमिकल तसेच कसलीही रासायनिक प्रक्रिया न करता हे सर्व घरगुती पद्धतीने बनवले ...

कोरोना च्या पार्श्वभूमीवर आयोजित मोफत शिबीरात पाचशे गरजू रूग्णांना औषध उपचार

Image
कोरोना च्या पार्श्वभूमीवर आयोजित मोफत शिबीरात पाचशे गरजू रूग्णांना औषध उपचार तुळजापूर ( प्रतिनिधी ) तालुक्यातील काक्रंबा येथील कै.अनंतराव जैन मेडीकल फाउंडेशन या सामाजिक संस्था व अनंतसाई क्लिनिक यांच्या संयुक्त विदयामाने गुरूवार दि ३० रोजी  आयोजित करण्यात आलेल्या मोफत तपासणी औषध उपचार व मास्क वाटप शिबीरात तब्बल पाचशे गरजूना मास्क वाटप करून तपासणी करून औषध उपचार करण्यात आले.संपूर्ण देशभरात कोरोना ग्रस्तांची दिवसागणिक वाढणाऱ्या  संख्यामुळे  एकच खळबळ उडाली असुन प्रशासन स्तरावर यावर प्रतिबंधतामक  आळा घालण्यासाठी मोठे प्रयत्न केले जात असुन महिना भरापासुन लाँकडाउन व संचारबंदी लागू करण्यात आल्याने सर्व सामान्य नागरिकांचे प्रचंड हाल सुरू आहे अशा संकटा च्या काळात अनेक सामाजिक संघटना दानशुर व्यक्तीने गरजूना संचारबदी काळात मदतीचे हात पुढे केले असतानाच तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा येथील कै.अनंतराव जैन मेडीकल फाउंडेशन या सामाजिक संस्थने  व अनंतसाई क्लिनिकच्या माध्यमातून गरीब व गरवंतासाठी मोफत तपासणी औषध उपचार व मास्क वाटपाचे गुरूवार दि ३० रोजी शिबीर आयोजित करण्य...

रामेश्वर उंबरे यांना विशेष सन्मान पदक

Image
रामेश्वर उंबरे यांना  विशेष सन्मान पदक तुळजापूर। ( प्रतिनिधी ) तुळजापूर खुर्द चे सुपुत्र रामेश्वर बापूराव उंबरे यांना  पोलीस महासंचालक  विशेष सन्मान  पदकाने गौरवण्यात आले आहे. सतत १५ वर्षे उत्तम सेवा बजावल्या बद्दल उंबरे यांना सन्मानित करण्यात येत असल्याचे म्हटले आहे. उंबरे सध्या जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात कार्यरत आहेत. उंबरे यांचा या यशाबद्दल त्यांचावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. 

अक्कलकोट ३०-कोविड - १९ चे विलगीकरण क्षेत्र शहरातून शहराबाहेर स्थलांतर करावे - अविनाश मडीखांबे

Image
कोविड - १९ चे विलगीकरण क्षेत्र शहरातून शहराबाहेर स्थलांतर करावे - अविनाश मडीखांबे अक्कलकोट शहर प्रतिनिधी- अक्कलकोट शहरातील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ येथे चप्प ळगाव मधील कोरोन Positive डॉक्टरच्या संपर्कात आलेल्या लोकांना अन्नछत्र मंडळ येथे क्वारटाईन करण्यात आलेले आहे त्याच ठिकाण. नगपपालीकेने भाजीमंडई सुरू कोली आहो  क्वारटाईन केलेल्या लोकांना मुळे नागरीक भाजी खरीदी करण्यास धाबरत आहोत तसेच आजूबाजूच्या परिसरातील म्हणजेच प्रभाग क्रमांक सात मधील बेडर गल्ली,भीम नगर, महादेव नगर, नाईकवाडी गल्ली, देशमुख गल्ली, स्वामी गल्ली, कुंभार गल्ली,टिळक गल्ली,डबरे गल्ली माळी गल्ली  या आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात लोकवस्ती असल्याने या सर्व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तरी अन्नछत्र मंडळामध्ये क्वारटाईन केलेल्या सर्व रुग्णांना त्वरित व लवकरात लवकर सोलापूर रस्त्यावरील जाधव आश्रमशाळेत स्थलांतरित करण्यात यावे. विशेष म्हणजे अक्कलकोट शहरातील 50000 लोकसंख्येचा देखील जिल्हाधिकाऱ्यांनी विचार करावा. जेणेकरून अक्कलकोट शहरात कोरोना चा प्रादुर्भाव वाढणार नाही. कारण अद्...

सहावी ते दहावीच्या विद्यार्थांचे आँनलाईन मोफत अध्यापन

Image
 सहावी ते दहावीच्या विद्यार्थांचे आँनलाईन मोफत अध्यापन  अक्कलकोट(शहर प्रतिनिधी :) येथील मराठा मंदिर श्री शहाजी प्रशालेच्या वतीने सर्व सहावी ते दहावीच्या विद्यार्थांचे आँनलाईन मोफत अध्यापन  केले जात असुन प्रशालेच्या या उपक्रमाचे सर्वच स्तरातुन कौतुक होत आहे.कोरोनाच्या महामारीमुळे सर्व शाळा बंद असल्याने विद्यार्थांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.सुरुवातीला दहावीच्या पाच वर्गासाठी प्रायोगिक तत्वावर हे वाँटसअप चे ग्रुप करून आँनलाईन वर्ग पंधरा दिवसापासुन सुरू करण्यात आले.विद्यार्थी व पालकां कडुन या उपक्रमाचे स्वागत केले गेल्याने उर्वरित सहावी ते नववी च्या प्रत्येक तुकडीचे वाँटसअँप ग्रुप तयार करून आँनलाईन अध्यापनासह आँडिओ , व्हिडिओ शैक्षणिक साहित्याच्या माध्यमातून अध्यापन सुरू करण्यात आले. प्रशालेचे मुख्याध्यापक ए.आर.कांबळे, उपमुख्याध्यापक एस.व्ही.भांगरे व पर्यवेक्षक आर.बी.भोसले  यांच्या नेतृत्वाखाली प्रशालेत शिकणाऱ्या इयत्ता सहावी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी व्हाट्सअप, झूम अँप, व्हिडिओ , शैक्षणिक साहित्याच्या  माध्यमातून  आँनलाईन मोफत  सर्व तु...

विरोधी पक्षनेते अक्कलकोटे यांच्या पुढाकाराने नागरिकांची तपासणी

Image
विरोधी पक्षनेते अक्कलकोटे यांच्या पुढाकाराने नागरिकांची तपासणी बार्शी दि (तालुका प्रतिनिधी) बार्शी नगरपालिकेचे विरोधी पक्षनेते नागेश अक्कलकोटे यांच्या पुढाकाराने शहरातील प्रभाग क्रमांक नऊ मधील नागरिकांची तपासणी करण्यात आली यावेळी मुख्याधिकारी शिवाजी गवळी,आरोग्य अधिकारी डॉ विजय गोदेपुरे, स्वच्छता निरीक्षक मनोज खरात,मिळकत विभाग प्रमुख महादेव बोकेफोडे,बाळासाहेब गुंड,कुलकर्णी व नागरिक उपस्थित होते करोनाच्या पार्श्वभूमीवर थर्मल स्कॅनर मशिन च्या सहाय्याने वार्डातील नागरिकांची घरोघरी जाऊन तपासणी करून करोना विषाणू बाबतीत जनजागृती करण्यात आली तसेच नगरपालिकेच्या वतीने शहरात घरोघरी जाऊन आरोग्य सर्वेक्षण करून विशिष्ट नमुन्यात सर्व कुटुंबाची माहिती संकलित करून आजारी नागरिकांची तपासणी करावी असे मत अक्कलकोटे यांनी व्यक्त केले तसेच यावेळी अक्कलकोटे यांनी सर्वेक्षण फॉर्म चा नमुना ही मुख्याधिकारी गवळी यांचेकडे दिला.

बार्शीच्या पाणी पुरवठ्याला महावितरणचा शॉक ; एकाच दिवशी तीन ठिकाणी घोटाळा

Image
बार्शीच्या पाणी पुरवठ्याला महावितरणचा शॉक एकाच दिवशी तीन ठिकाणी घोटाळा बार्शी दि (तालुका प्रतिनिधी) बुधवारी एकाच दिवशी तीन ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाल्याने बार्शी,शहरातील पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे.काल बुधवारी सकाळी दहा ते साडेअकरा या वेळेत बार्शीतील वीज पुरवठा  खंडित झाला तर दुपारी  बारा वाजलेपासून कंदर आणि सायंकाळी सहा वाजेपर्यंत कुर्डुवाडी येथील वीज खंडित झाला होता त्यामुळे बार्शीच्या पाणी पुरवठ्यावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला  सरासरी दररोज एक कोटी नव्वद हजार लिटर पाण्याचे पंपिंग होते मात्र काल पम्पिंग वर परिणाम झाला त्यामुळे आज शहरातील काहीभागाला उशीराने तर काही भागात गॅप पडला आहे मात्र उद्या सकाळी पूर्ववत पाणी पुरवठा होईल अशी माहिती जलदाय अभियंता अजय होनखांबे यांनी दैनिक जनसत्य बरोबर बोलताना दिली

महात्मा बसवेश्वरांच्या जयंतीनिमित्त किराणा मालाचे वाटप

Image
महात्मा बसवेश्वरांच्या जयंतीनिमित्त किराणा मालाचे वाटप कोरवली येथील शिव बसव जन्मोत्सव समितीचा अनोखा उपक्रम कामती ( प्रतिनिधी ) जगत् ज्योती महात्मा बसवेश्वर महाराजांच्या ८८९ जयंतीनिमित्त मोहोळ तालुक्यातील कोरवली येथील शिवबसव जन्मोत्सव समितीच्या वतीने गावातील ७० गरीब व गरजू व्यक्तींना किराणा मालाचे तसेच २५० सॅनेटायझरचे मोफत वाटप करण्यात आले. यावेळी मोहोळचे तहसीलदार जीवन बनसोडे,  कामती पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण उंदरे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. या वाटपाचे आयोजन शिवा संघटनेचे सोलापूर जिल्हा संघटक व मंडळाचे मार्गदर्शक सिध्दाराम म्हमाणे यांनी केले होते.कोरवली येथील शिवबसव जन्मोत्सव समितीच्या वतीने महात्मा बसवेश्वर महाराज व छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती प्रत्येक वर्षी मोठ्या उत्साहात साजरी केली जात होती. परंतु यावर्षी या संसर्गजन्य विषाणूच्या महामारी मुळे शासनाच्या आदेशान्वये सार्वजनिक जयंती साजरी केले गेले नाही. जयंतीचा यावर्षीचा खर्च टाळून समितीच्यावतीने ७०  गरीब व गरजू व्यक्तींना अत्यावश्यक किराणा मालाचे वाटप करण्यात आले. तसेच ग्रामपंचायत कर्म...

बार्शीतील रस्त्यावर अवतरले यम आणि चित्रगुप्त

Image
बार्शीतील रस्त्यावर अवतरले यम आणि चित्रगुप्त बार्शी दि (तालुका प्रतिनिधी) नागरिकांनी उंबरा ओलढू नाये घरातच बसा व आरोग्य जपा  असा संदेश देण्यासाठी बार्शी केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन व बार्शी पोलीस स्टेशन च्या सहकार्य तुन करोना विषाणू बाबत जनजागृती करताना केमिस्ट असो चे सभासद सभासद विजयकुमार माळी व विशाल बरदाळे यांनी  यम आणि चित्रगुप्त ची वेशभूषा करून आज शहरातील रस्त्यावरून  करोना विषाणू  बाबतीत  जनजागृती केली  अभिनव व नाविन्यपूर्ण  उपक्रमाने नागरिकांचे लक्ष वेधले होते यावेळी पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी, मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष आबा राऊत,अभिजित गाढवे, पद्मसिंह पवार, उमेश काळे योगेश फोफले,सई क्लिनिकचे नितीन मोरे,सह्याद्री मेडिकल चे गिरीश कदम,गोपनीय विभागाचे पो हे कॉ बाळासाहेब नाईकनवरे, संजय खैरे आदी उपस्थित होते

बार्शीच्या कर्तव्यदक्ष प्रशासनामुळे त्या पॉझिटिव्ह व्यक्तीचा काही तासांत छडा

Image
बार्शीच्या कर्तव्यदक्ष प्रशासनामुळे  त्या पॉझिटिव्ह व्यक्तीचा काही तासांत छडा बार्शी दि (तालुका प्रतिनिधी)  तहसीलदार प्रदीप शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली बार्शीच्या पोलीस,आरोग्य आणि नगरपालिका प्रशासनाने  वसमत जि हिंगोली येथील त्या पॉझिटिव्ह  व्यक्ती बार्शीत आले नसल्याचा तपास केला आहे त्यामुळे काही वेळ टेन्शन घेतलेल्या बार्शीकरांनी सुटकेचा श्वास सोडला वसमत येथील एक करोना बाधित द्राक्षे व्यापारी बार्शीतून आला असल्याची माहिती हिंगोली जिल्हा प्रशासनाने जाहीर केली होती त्यामुळे काल बुधवारी दुपारी तीन वाजले पासून शहरातील भवानी पेठेत आरोग्य विभाग, नगरपालिका आणि पोलिसांनी तळ ठोकून या भागात फवारणी तसेच सदर व्यक्ती ज्या ठिकाणी राहत होता त्या  ठिकाणच्या लोकांची चौकशी, तपासणी करून पॉझिटिव्ह व्यक्ती च्या संपर्कात आलेल्या व्यक्ती चा शोध सुरू केला होता या चौकशीत भवानी पेठेत सध्या नऊ द्राक्षे व्यापारी राहत असल्याची माहिती मिळाली त्यावरून त्या पॉझिटिव्ह व्यक्ती चा तपास केला असता तो यापूर्वी कधीही बार्शीत आला नसल्याची माहिती पुढे आली त्यामुळे पॉझिटिव्ह व्यक्ती न...

प्रशासनाने काळजीपूर्वक अंमलबजावणी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

Image
प्रशासनाने काळजीपूर्वक अंमलबजावणी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश लॉकडाऊनमुळे अडकलेल्या नागरिकांना राज्याचा दिलासा मंत्रालय नियंत्रण कक्ष देखरेख ठेवणार , जिल्हाधिकारी स्थलांतरणाची कार्यवाही करणार मुंबई दि ३०: लॉकडाऊनमुळे राज्यात व राज्याबाहेर ठिकठिकाणी अडकलेल्या स्थलांतरित कामगार, यात्रेकरू, विद्यार्थी, यात्रेकरू तसेच इतर नागरिकांना त्यांच्या इच्छित स्थळी जाण्यासाठी महाराष्ट्र शासनाने कार्यपद्धती निश्चित केली असून सर्व जिल्हाधिकारी हे नोडल अधिकारी असतील तसेच मंत्रालयातील नियंत्रण कक्षाद्वारे यावर देखरेख ठेवली जाईल. याबाबतीत अतिशय काळजीपूर्व व जबाबदारीने सर्व यंत्रणांनी अंमलबजावणी करावी असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. मंत्रालयात महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ नितीन करीर, महिला बाल विकास प्रधान सचिव आय.ए कुंदन, तसेच संचालक , आपत्ती व्यवस्थापन अभय यावलकर यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. ०२२-२२०२७९९०, ०२२-२२०२३०३९ हे दूरध्वनी क्रमांक असून  controlroom@maharashtra.gov.in  हा ईमेल देण्यात आला आहे.  जिल्ह्यांचे न...

सामाजिक घडामोडींवर परखड भाष्य करणारे सदाबहार अभिनेते ऋषी कपूर यांच्या निधनाने सिनेसृष्टीची मोठी हानी - केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले*

Image
सामाजिक घडामोडींवर परखड भाष्य करणारे सदाबहार अभिनेते ऋषी कपूर यांच्या निधनाने सिनेसृष्टीची मोठी हानी - केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले* मुंबई दि. 30 - सदाबहार अभिनेते ऋषी कपूर यांच्या निधनाने भारतीय चित्रपट सृष्टीचे मोठे नुकसान झाले आहे. आपल्या अभिनयाने चित्रपट सृष्टीला समृद्ध करणारा चेहरा म्हणून ऋषी कपूर सिने रसिकांच्या चिर स्मरणात राहतील. सिने सृष्टीत राज कपूर यांचा वारसा चालविताना आपल्या कसदार अभिनयाच्या बळावर त्यांनी स्वतःची वेगळी प्रतिमा स्थान  निर्माण करणारे ऋषी कपूर यांच्यावर प्रेम करणारा मोठा चाहता वर्ग होता. ऋषी कपूर हे सामाजिक घडामोडींवर परखड स्पष्ट भाष्य करणारे अभिनेते म्हणून त्यांनी समाज जीवनावर आपली वेगळा ठसा  उमटविला होता. असे सांगत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी दिवंगत ऋषी कपूर यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.

निलेगाव येथे किराणा मालाचे किट व भाजीपाला वाटप

Image
निलेगाव येथे किराणा मालाचे किट व भाजीपाला वाटप  नळदुर्ग :-  तुळजापूर तालुक्यातील निलेगाव येथे सौर ऊर्जेच्या टॉवरचा काम करणाऱ्या पश्चिम बंगाल येथील मजुरांची कोरोनाच्या संकटकालीन परिस्थितीमध्ये लाॅकडाऊन असल्याने उपासमार होऊ नये म्हणून ग्रामपंचायत कार्यालय निलेगाव व पोलीस पाटील मधुकर चव्हाण यांच्या वतीने 29 एप्रिल रोजी किराणा मालाचे किट व भाजीपाला  वाटप करण्यात आले यावेळी सरपंच नुरजहा सौदागर  कोरोना सहायता कक्ष प्रमुख  नाबदे मॅडम, पोलिस पाटील मधुकर चव्हाण , ग्रामसेवक संजय माशाळे डॉ. शफिक रिसालदार ,सामाजिक कार्यकर्ते बसवराज जमादार, रफिक पटेल व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते

कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी अडीच लाख रुपये निधी

Image
कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या वतीने  मुख्यमंत्री सहायता निधीसाठी अडीच लाख रुपये निधी नळदुर्ग  :- येथील कला, विज्ञान व वाणिज्य  महाविद्यालयाच्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी २लाख ५० हजार रुपयांचा मदतनिधी बालाघाट शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार मधुकरराव चव्हाण यांच्या हस्ते उस्मानाबादच्या जिल्हाधिकारी डॉ. दीपा मुधोळ मुंडे यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले. कोरोनाच्या संकटकालीन परिस्थितीमध्ये नळदुर्ग येथील बालाघाट शिक्षण संस्थेच्या कला  विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचा पगार सुमारे अडीच लाख रुपये मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 29 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी डॉ.  दिपा मुधोळ मुंडे यांच्याकडे धनादेशाद्वारे देण्यात आले. याप्रसंगी बालाघाट शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा माजी आमदार मधुकरराव चव्हाण , संस्थेचे सचिव उल्हास बोरगावकर,  संचालक रामचंद्र  आलुरे,  प्राचार्य डॉ.  संजय कोरेकर यांची उपस्थिती होती. विशेष म्हणजे बालाघाट शिक्षण संस्थेच्या तुळजापूर येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाने या...

खते, बियाणे बांधावर देण्यासाठी प्रयत्न करा : पालकमंत्री दत्तात्रय भरणे

Image
खते, बियाणे बांधावर देण्यासाठी प्रयत्न  करा :पालकमंत्री दत्तात्रय भरणे  खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत सूचना   सोलापूर :  खते आणि बियाणे शेतक-यांच्या बांधावर उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करा अशा सूचना पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज कृषी विभागाला दिल्या. पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय खरीप हंगामापूर्व आढावा बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे झाली. व्हिडीओ कॅान्फरन्सच्या माध्यमातून झालेल्या या बैठकीस जिल्ह्यातील सन्माननीय खासदार, आमदार, जिल्हा परिषदेचे पदाधिकारी सहभागी झाले.             जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज बिराजदार, महावितरण अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर, जिल्हा उप निबंधक कुंदन भोळे, उपसंचालक रवींद्र माने, नाबार्डचे प्रदिप झिले, जिल्हामध्यवर्ती बॅकेचे व्यवस्थापक किसन मोटे  आदी अधिकारी उपस्थित होते.  बैठकीत सुरवातीला श्री. बिराजदार यांनी खरीप हंगामाचे नियोजन थोडक...

टेन्शन वाढलं! देशात १८२३ नवे करोना रुग्ण, २४ तासात ६७ मृत्यू

Image
टेन्शन वाढलं! देशात १८२३ नवे करोना रुग्ण, २४ तासात ६७ मृत्यू देशभरातील करोनाग्रस्तांची संख्या ३३ हजार ६१० झाली आहे देशभरात १८२३ नवे करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तर मागील २४ तासात ६७ जणांचा मृत्यू झाला आहे. आता देशभरातील करोनाग्रस्तांची संख्या ३३ हजार ६१० झाली आहे. यापैकी ८ हजार २७३ रुग्णांना आत्तापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आत्तापर्यंत करोनाची लागण होऊन १ हजार ७५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने ही माहिती दिली आहे देशात करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी १४ एप्रिलपर्यंत जाहीर करण्यात आलेला लॉकडाउन ३ मे पर्यंत वाढवण्यात आला. यापुढे काय उपाय योजना करायच्या तेदेखील स्पष्ट होईल. तूर्तास भारतात रुग्णांची वाढती संख्या हा चिंतेचा विषय झाला आहे.

वृक्षसंवर्धनासाठी बार्शीतील पाऊणशे वर्षाच्या शेलारमामांची धडपड

Image
वृक्षसंवर्धनासाठी बार्शीतील पाऊणशे वर्षाच्या शेलारमामांची  धडपड भीषण उन्ह आणि लॉक डाऊन पाणी घालण्याचा प्रयत्न  बार्शी दि( संजय बारबोले)    : आजच्या भीषण उन्हाळ्यात आणि लॉक डाऊन काळातही झाडं जोपासण्यासाठी बार्शीतील किसन लोखंडे उर्फ आप्पा या पाऊणशे वर्षाच्या शेलारमामांची धडपड म्हणजे तरुणांसाठी एक प्रकारची प्रेरणाच आहे  वृक्ष लागवड आणि संवर्धनाची  बार्शीला मोठी परंपरा आहे  स्व वायूपुत्र नारायणराव जगदाळे ,रवी फाउंडेशन,पक्षनेते विजय राऊत, वृक्ष संवर्धन समिती आदींच्या माध्यमातून बार्शीत वृक्ष संवर्धनासाठी मोठ्या प्रमाणात चळवळ सुरू आहे त्याचाच एक भाग म्हणून आमदार राजेंद्र राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली बाजार समिती ने संपूर्ण आवारात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करून ट्री गार्ड तसेच पाण्याची सोय केलेली आहे अशाच काही झाडांना पंच्याहत्तर वर्षाचे लोखंडे आप्पा नियमितपणे पाणी घालत आहेत लोखंडे हे आडत दुकानात मुनीम म्हणून काम करत आहेत मात्र त्यांची झाडं जगवण्यासाठी ची धडपड निश्चितच सर्वांसाठी प्रेरणादायी अशी आहे अशा शेलारमामा मुळे भविष्यात नक्कीच ही सर्व झ...

सोलापुरात एका दिवसात सापडले 21 रुग्ण ,रुग्णांची संख्या 102 झाली

Image
सोलापुरात एका दिवसात सापडले 21 रुग्ण  रुग्णांची संख्या 102 झाली सोलापुरात 102 रुग्ण कोरोनाबाधित असून त्यापैकी सहा जणांचा मृत्यू झालेला आहे. सोलापुरात कोरोना चाचणीची संख्या अधिक असल्याने अधिक रुग्ण सापडत आहेत. सोलापूर :  सोलापूर शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 102 झाली असून आज (गुरुवारी) एका दिवसात 21 जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले, अशी माहिती सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. खरीप हंगाम आढावा बैठकीसाठी पालकमंत्री भरणे आज सोलापूरच्या दौऱ्यावर आले आहेत.

बार्शीत निवडक किराणा दुकानदारांकडून लॉक डाऊन मर्यादेचेउल्लंघन

Image
बार्शीत निवडक किराणा दुकानदारांकडून  लॉक डाऊन मर्यादेचेउल्लंघन बार्शी दि (तालुका प्रतिनिधी) बार्शीतील काही निवडक किराणा दुकानदारांकडून सोशल डिस्टन्स बरोबरच आता लॉक डाऊन वेळेचे उल्लंघन होत असल्याचे दिसून आले करोना संसर्ग रोखण्यासाठी बार्शी नगरपालिकेने अत्यावश्यक सेवा म्हणून किराणा, भाजीपाला, दूध पेट्रोल पंप बाबतीत गर्दी टाळण्यासाठी सुधारित वेळापत्रक दिले आहेत्याप्रमाणे दुपारी दोन वाजता किराणा दुकान बंद करणे अपेक्षित आहे मात्र काही किराणा दुकानदार लोडिंगच्या नावाखाली दुपारी तीन चार वाजेपर्यंत विक्री सुरू ठेवतात त्यामुळे शहरात गर्दी होत आहे तरी अशा दुकांदारावर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी होत आहे
Image
कुर्डूवाडीत भाजपाच्या वतीने अटल भोजन उपक्रमाची सुरुवात कुर्डूवाडी प्रतिनिधी : कोरोना सारख्या व्हायरल आजारामुळे लाॅकडाऊनच्या काळात जगच बंद पडल्याने गोरगरीबांना कामधंदा नसल्याने,मजुरी मिळेना. जेव्हा काम करू तेंव्हाच खायला मिळेल अशा लोकांची सोय करण्याच्या हेतूने अटल भोजनाची सुरुवात  भारतीय जनता पार्टीचे तालूकाध्यक्ष संजयदादा टोणपे यांच्या वतीने  करण्यात आली यामध्ये लाॅकडाऊनच्या  काळत रोज किमान दिडशे ते दोनशे लोकांना कुर्डूवाडी शहर व आसपासच्या गोरगरीब, श्रमीक,कामगार,अनाथ अशा लोकांना जेवण पुरविण्यात येणार आहे   या अटल भोजन उपक्रमाची सुरुवात भारतीय जनता पार्टीचे प्रांतीय सदस्य गोवींद कुलकर्णी, माजी नगराध्यक्ष राजेंद्र पारखे यांच्या हस्ते करण्यात आली.यावेळी संजयदादा टोणपे प्रकाश किर्वे,मोहन गायकवाड,योगेश उघाडे,सौरभ परबत,जोतिराम आवारे,रामभाऊ वाघमारे,दत्ता लोखंडे,सूर्यकांत पाटील,बालाजी लूक्कडओंकार म्हस्के,प्रदीप कापरे,स्वप्नील तेली,महेश जानराव,सिद्धू कांबळे,सौमीत्र परबत,गणेश पवार हे उपस्थित होते.   या उपक्रमात रोज श्रद्धा केटरिंगचे सचीन परबत,...

पोलीसांना हेल्मेट कीटचे वाटप

Image
पोलीसांना हेल्मेट  कीटचे वाटप मोहोळ,(तालुका प्रतिनिधी):  कोरोना विषाणुच्या संसर्गापासुन पोलीसांना अधिक सुरक्षितता प्राप्त होण्यासाठी जिजाऊ बिग्रेडच्या तालुकाध्यक्षा शुभांगी लंबे( माने ) यांनी पोलीसांना हेल्मेट कीटचे वाटप केले .  मोहोळ तालुक्यामध्ये प्रशासनाच्या आदेशानुसार नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस अतिशय जबाबदारीने कायदा व सुव्यवस्था हाताळत आहेत .परिणामी नागरिकांच्या आरोग्याची  काळजी घेणाऱ्या  पोलीसांच्याही आरोग्याची काळजी घेत मोहोळ तालुका जिजाऊ बिग्रेडच्या तालुकाध्यक्षा शुभांगी लंबे (माने) यांनी स्वखर्चाने मोहोळ पोलीस ठाण्यातील सर्व कर्मचाऱ्यांना हेल्मेट किटचे वाटप केले . या प्रसंगी  पोलीस निरीक्षक सुर्यकांत कोकणे , सहाय्यक पो.नि. बाडीवाले , इंगळे , यांच्यासह संतोष गायकवाड , माने सर , किरण गायकवाड पोलीस कर्मचारी  निलेश देशमुख , मुन्ना बाबर , अभिजित घाटे , शरद डावरे ,हरिभाऊ चौधरी,  आदीसह बहुसंख्य कर्मचारी उपस्थित होते .

विधान परिषदेच्या निवडणुका घ्या, राज्य शासन निवडणूक आयोगाला करणार विनंती

Image
विधान परिषदेच्या निवडणुका घ्या, राज्य शासन निवडणूक आयोगाला करणार विनंती राज्यशासनाच्या उच्चपदस्थ सूत्रांची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विधानपरिषदेच्या नियुक्तीवरून राज्यावर राजकीय अस्थिरतेचे ढग असताना राज्य शासन भारताच्या निवडणूक आयोगाला विधान परिषदेच्या स्थगित केलेल्या निवडणुका घेण्याबाबत विनंती करणार आहे. याबाबतचे पत्र गटनेत्यांच्या सहीसह लवकरच आयोगाकडे पाठवण्यात येईल अशी माहिती राज्यशासनाच्या उच्चपदस्थ सूत्रांनी दिली. मुख्यमंत्री व शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे हे विधान मंडळाच्या दोन्ही पैकी कुठल्याही सभागृहाचे सदस्य नाहीत. २७ मे पर्यंत त्यांना विधान मंडळाचे सदस्य व्हावे लागेल अन्यथा राजीनामा देण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्याय उपलब्ध नसेल. विधान परिषदेच्या नऊ जागांच्या निवडणुका एप्रिलमध्ये होणे अपेक्षित होतं मात्र करोना वायरसच्या फैलावामुळे निवडणूक आयोगाने त्या अनिश्चित काळासाठी पुढे ढकलल्या होत्या. ९ एप्रिलला राज्याच्या मंत्रिमंडळाने उद्धव ठाकरेंची नियुक्ती राज्यपालांच्या कोट्यातून विधानपरिषदेवर करावी असा निर्णय घेतला होता आणि तसा ठराव राज्यपाल...

बॉबी, कर्ज, प्रेम रोग असे हिट चित्रपट देणाऱ्या ऋषी कपूर यांचा असा घडला प्रवास

Image
बॉबी, कर्ज, प्रेम रोग असे हिट चित्रपट देणाऱ्या ऋषी कपूर यांचा असा घडला प्रवास बॉलिवूडचं एक एव्हरग्रीन व्यक्तीमत्व ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचं आज निधन झालं. प्रातिनिधीक छायाचित्र भारतीय सिनेसृष्टीत महत्वाचं योगदानं देणाऱ्या कपूर घराण्यातील एक बिनधास्त व्यक्ती आणि बॉलिवूडचं एक एव्हरग्रीन व्यक्तीमत्व ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचं आज निधन झालं. विविध चित्रपटांमध्ये दर्जेदार भुमिका साकारणाऱ्या ऋषी कपूर यांचा असा घडला सिनेसृष्टीतला प्रवास…. ऋषी कपूर यांचा जन्म ४ सप्टेंबर १९५२ रोजी दक्षिण मुंबईत झाला. ‘चिंटू’ या टोपण नावानेही ते ओळखले जात. बॉलिवूडचे शोमॅन दिग्दर्शक आणि अभिनेते राज कपूर यांचे ते दुसरे पुत्र. ज्येष्ठ बंधू रणधीर कपूर आणि राजीव कपूर यांच्यासोबत त्यांनी मुंबईतील कॅम्पेन स्कूल कॉन्व्हेंट स्कूलमधून शिक्षण घेतलं. ऋषी कपूर यांनी सिनेसृष्टीत पहिलं पाऊल टाकलं ते त्यांचे वडील राज कपूर दिग्दर्शित आणि अभिनित मेरा नाम जोकर (१९७०) या सिनेमातून. या सिनेमात त्यांनी त्यांच्या वडिलांची लहानपणीची भुमिका साकारली होती. त्यानंतर ते पहिल्यांदा डिंपल कपाडियासोबत बॉबी (१९७३) या स...

प्लाझ्मा थेरेपीचा पहिला प्रयोग केलेल्या ‘त्या’ रुग्णाचा मृत्यू

Image
प्लाझ्मा थेरेपीचा पहिला प्रयोग केलेल्या ‘त्या’ रुग्णाचा मृत्यू प्रथमच शनिवारी लीलावती रुग्णालयातील ५२ वर्षीय रुग्णावर हा प्रयोग करण्यात आला होता. संग्रहित छायाचित्र प्लाझ्मा थेरेपीचा पहिला प्रयोग केलेल्या रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईत करोनाबाधित रुग्णांवर रक्तद्रव उपचाराचा (प्लाझ्मा थेरपी) प्रयोग प्रथमच शनिवारी लीलावती रुग्णालयातील ५२ वर्षीय रुग्णावर करण्यात आला होता. त्या रुग्णाचा अखेर आज मृत्यू झाला. ताप, सर्दी आणि फुप्फुसाचा संसर्ग झाल्याने ५२ वर्षीय रुग्णाला २० एप्रिलला वांद्रे येथील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. चाचण्यांमध्ये त्या व्यक्तीला करोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झालं होतं. त्यानंतर या रुग्णाला कृत्रिम श्वसनयंत्रणेवरही ठेवण्यात आलं आहे. त्यानंतर रुग्णालयानं पालिकेकडे त्यांच्यावर प्लाझ्मा थेरेपीचा प्रयोग करण्याची परवानगी मागितली होती. रुग्णाचा जीव वाचविण्यासाठी हे उपचार केले जात असल्याने पालिकेने प्लाझ्मा थेरेपी देण्यास मंजुरी दिली. त्यानुसार शनिवारी नायर रुग्णालयात करोना संसर्गातून बरे झालेल्या रुग्णांनी दान केलेले प्लाझ्...