सामाजिक घडामोडींवर परखड भाष्य करणारे सदाबहार अभिनेते ऋषी कपूर यांच्या निधनाने सिनेसृष्टीची मोठी हानी - केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले*
सामाजिक घडामोडींवर परखड भाष्य करणारे सदाबहार अभिनेते ऋषी कपूर यांच्या निधनाने सिनेसृष्टीची मोठी हानी - केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले*
मुंबई दि. 30 - सदाबहार अभिनेते ऋषी कपूर यांच्या निधनाने भारतीय चित्रपट सृष्टीचे मोठे नुकसान झाले आहे. आपल्या अभिनयाने चित्रपट सृष्टीला समृद्ध करणारा चेहरा म्हणून ऋषी कपूर सिने रसिकांच्या चिर स्मरणात राहतील. सिने सृष्टीत राज कपूर यांचा वारसा चालविताना आपल्या कसदार अभिनयाच्या बळावर त्यांनी स्वतःची वेगळी प्रतिमा स्थान निर्माण करणारे ऋषी कपूर यांच्यावर प्रेम करणारा मोठा चाहता वर्ग होता. ऋषी कपूर हे सामाजिक घडामोडींवर परखड स्पष्ट भाष्य करणारे अभिनेते म्हणून त्यांनी समाज जीवनावर आपली वेगळा ठसा उमटविला होता. असे सांगत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी दिवंगत ऋषी कपूर यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.
Comments
Post a Comment