दैनिक 'जनसत्य'च्या बातमीच्या सत्यतेवर शिक्कामोर्तब
दैनिक 'जनसत्य'च्या बातमीच्या सत्यतेवर शिक्कामोर्तब
शिवसेनेच्या आंदोलनाला यशजगदाळे मामा हॉस्पिटलमध्ये करोनावर उपचार मोफतचदोन दिवसांपूर्वी मोफत उपचार नाही म्हणून सांगणाऱ्या डॉ यादव यांचा यूटर्न
बार्शी (प्रतिनिधी) शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर यांच्या आंदोलनानंतर खडबडून जागे झालेल्या जगदाळे मामा हॉस्पिटलचे सर्वेसर्वा डॉ यादव यांनी आजपासूनच कोविड रुग्णांवर मोफत उपचार केले जातील अशी घोषणा करत महात्मा फुले आरोग्य योजनेच्या कार्यालयाचे उद्घाटन आंधळकर यांचेहस्ते केले यावेळी शिवसेना शहर प्रमुख दीपक आंधळकर, राजेंद्र गायकवाड, समीर सैय्यद, बापू तेलंग,एलियास शेख,शाहिद पठाण, ईश्वर साखरे,मॅक्स शिंदे, समीर सैय्यद, युवराज वाघमारे, इब्राहिम काझी, मोहसीन सैय्यद, सोनू नवगण,अन्वर मुजावर, सोमा थंब,सोमनाथ कांबळे, अतुल इटकर, जावेद पठाण,कलूशेख,रमेश चौधरी, हबीब सैय्यद, महेश साखरे,आदी सह शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
अधिक माहिती अशी की जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार शासनाच्या महात्मा फुले जण आरोग्य योजनेतून कोविड रुग्णांवर मोफत उपचार करण्यासाठी जगदाळे मामा हॉस्पिटल समावेश करण्यात आला आहे तरीही केवळ स्वतंत्र कक्ष नाही, संगणक नाही अशी तांत्रिक बाबी सांगून मोफत उपचार करण्यासाठी हॉस्पिटल कडून टाळाटाळ केली जात होती याबाबत सर्वप्रथम दैनिक जनसत्य ने दि २९ जून रोजी वृत्त प्रकाशित केले आहे त्यानंतर सध्या जगदाळे मामा हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार नसल्याचा खुलासा शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ बी वाय यादव यांनी केला होता मात्र अशा किरकोळ कारणांवरून अडचणीत आलेल्या लोकांना वेठीस धरू नये शासनाच्या आदेशानुसार योजनेचा लाभ तातडीने सुरू करावा या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने आज हॉस्पिटल आवारात आंदोलन करण्यात आले त्यावर डॉ यादव यांनी सदर योजनेचा लाभ आजपासून च सुरू करण्यात येईल असा जाहीर खुलासा केला आणि तातडीने कार्यालयाचे उद्घाटन ही केले वास्तविक पाहता
कर्मवीर जगदाळे मामांच्या संस्थेचे अशा प्रकारे किरकोळ कारणावरून शासनाच्या योजनेपासून सर्वसामान्य लोकांना वंचीत ठेवणे योग्य नाही.
जगदाळे मामा हॉस्पिटल चे वैद्यकीय अधीक्षक डॉ आर व्ही जगताप हे पूर्णवेळ हॉस्पिटलमध्ये उपलब्ध राहत नाहीत रुग्ण आणि नातेवाईकांशी उद्धटपणे वागतात, कोविड रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर आणि स्टाफ बाबतीत विशेष काळजी घेत नाहीत त्यांच्या निष्काळजीपणा मुळेच जगदाळे मामा हॉस्पिटल मधून करोना चा प्रादुर्भाव झाला ही बाब गंभीर असून जगताप यांची तातडीने हकालपट्टी करावी अन्यथा त्यासाठी वेगळे आंदोलन करण्यात येईल असा इशारा आंधळकर यांनी यावेळी दिला.
Comments
Post a Comment