पोलीस नाईक धनाजी सराटे याला ३० हजारांची लाच घेताना अटक



पोलीस नाईक धनाजी सराटे याला ३० हजारांची लाच घेताना अटक

भाऊबंदकीतला वाद मिटवण्यासाठी मागितली लाच


बारामतीत १२ हजारांची लाच घेताना ...

संग्रहित छायाचित्र

कोल्हापूर पोलीस ठाण्याच्या आवारात ३० हजार रुपयाची लाच स्वीकारताना एका पोलीस नाईकाला शनिवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. त्याला अटक करण्यात आली आहे. शाहुवाडी पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक धनाजी हरी सराटे (वय ४५, मूळ रा. देवाळे, ता. पन्हाळा, सध्या रा. चनवाड रोड, शाहुवाडी) असे या पोलिसाचे नाव आहे.

भाऊबंदकी च्या वादातून निर्माण झालेला वाद मिटवण्यासाठी लाचेची मागणी करण्यात आली होती.तक्रारदारच्या साडूचे त्यांच्या भाऊबंधाशी भांडण झाले होते. याप्रकरणी शाहुवाडी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. या गुह्याचा तपास पोलीस नाईक धनाजी सराटे करीत आहेत. या गुह्याच्या तपासकामात मदत करण्यासाठी सराटे याने त्याच्याकडे ३० हजार रुपयांची मागणी केली. या मागणीबाबत कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करण्यात आली.

या दाखल तक्रारीची लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पोलीस अधिकाऱयांनी पडताळणी केली. या पडताळणीमध्ये सराटेने लाच मागितल्याचे समोर आले. त्यावरुन शुक्रवारी दुपारी सापळा लावण्यात आला. त्यावेळी मागणी केलेल्या ३० हजार रुपयापैकी तडजोडीअंती २० हजार रुपये स्विकारताना त्याला लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पोलीस अधिकाऱयांनी पकडून अटक केली. या कारवाईत पोलीस उपाधीक्षक आदिनाथ बुधवंत, हवालदार मनोज खोत, पोलीस नाईक विकास माने, नवनाथ कदम, कॉन्स्टेबल मयूर देसाई आदीच्या पथकांने भाग घेतला.

Comments


Popular posts from this blog

कामाशिवाय घराबाहेर पडू नये

श्रीशा करंजकर हिचे यश

दैनिक 'जनसत्य'च्या बातमीच्या सत्यतेवर शिक्कामोर्तब