कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी अडीच लाख रुपये निधी
कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या वतीने
मुख्यमंत्री सहायता निधीसाठी अडीच लाख रुपये निधी
नळदुर्ग :- येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी २लाख ५० हजार रुपयांचा मदतनिधी बालाघाट शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार मधुकरराव चव्हाण यांच्या हस्ते उस्मानाबादच्या जिल्हाधिकारी डॉ. दीपा मुधोळ मुंडे यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले. कोरोनाच्या संकटकालीन परिस्थितीमध्ये नळदुर्ग येथील बालाघाट शिक्षण संस्थेच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचा पगार सुमारे अडीच लाख रुपये मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 29 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी डॉ. दिपा मुधोळ मुंडे यांच्याकडे धनादेशाद्वारे देण्यात आले. याप्रसंगी बालाघाट शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा माजी आमदार मधुकरराव चव्हाण , संस्थेचे सचिव उल्हास बोरगावकर, संचालक रामचंद्र आलुरे, प्राचार्य डॉ. संजय कोरेकर यांची उपस्थिती होती. विशेष म्हणजे बालाघाट शिक्षण संस्थेच्या तुळजापूर येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाने यापूर्वी २ लाख ४७ हजार रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिले असून कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाकडून २ लाख ५० हजार अशी एकूण ४ लाख ९७ हजार रक्कम संस्थेकडून दिली गेली आहे. याशिवाय गोरगरीब नागरिकांना ५०० किराणा साहित्याचे किट देखील संस्थेकडून दिले गेले आहेत.
Comments
Post a Comment