कोरोना च्या पार्श्वभूमीवर आयोजित मोफत शिबीरात पाचशे गरजू रूग्णांना औषध उपचार
कोरोना च्या पार्श्वभूमीवर आयोजित मोफत शिबीरात पाचशे गरजू रूग्णांना औषध उपचार
तुळजापूर ( प्रतिनिधी )तालुक्यातील काक्रंबा येथील कै.अनंतराव जैन मेडीकल फाउंडेशन या सामाजिक संस्था व अनंतसाई क्लिनिक यांच्या संयुक्त विदयामाने गुरूवार दि ३० रोजी आयोजित करण्यात आलेल्या मोफत तपासणी औषध उपचार व मास्क वाटप शिबीरात तब्बल पाचशे गरजूना मास्क वाटप करून तपासणी करून औषध उपचार करण्यात आले.संपूर्ण देशभरात कोरोना ग्रस्तांची दिवसागणिक वाढणाऱ्या संख्यामुळे एकच खळबळ उडाली असुन प्रशासन स्तरावर यावर प्रतिबंधतामक आळा घालण्यासाठी मोठे प्रयत्न केले जात असुन महिना भरापासुन लाँकडाउन व संचारबंदी लागू करण्यात आल्याने सर्व सामान्य नागरिकांचे प्रचंड हाल सुरू आहे अशा संकटा च्या काळात अनेक सामाजिक संघटना दानशुर व्यक्तीने गरजूना संचारबदी काळात मदतीचे हात पुढे केले असतानाच तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा येथील कै.अनंतराव जैन मेडीकल फाउंडेशन या सामाजिक संस्थने व अनंतसाई क्लिनिकच्या माध्यमातून गरीब व गरवंतासाठी मोफत तपासणी औषध उपचार व मास्क वाटपाचे गुरूवार दि ३० रोजी शिबीर आयोजित करण्यात आलेले होते सदरील शिबीरात सोशियल डिस्टींगचे पालन करत या शिबीरात गरजु पाचशे लोकांची मोफत तपासणी व औषध उपचार करून मास्कचे वाटप करण्यात आले .यावेळी भाजप चचे जिल्हा सरचिटणीस गुलचंद व्यवहारे,माजी चेअरमन हरिदास वटटे,उपसरपंच अरविंद कानडे,तंटामुक्त समिती अध्यक्ष प्रशांत देवगुंडे,उमेश खांडेकर,सुर्यकांत ढोकर,लक्ष्मण धोंगडे,महादेव मोहिते ,पदमराज गडदे,ग्रामविकासधिकारी अशोक वडकुते,आदी उपस्थितीत होते.या शिबीरात डाँ.अभिजीत जैन यांनी दिवसभर मोफत तपासणी केली तर औषध निर्माता सोमनाथ वैध,सुप्रिया जैन,यांनी औषध गोळया व मास्क वाटप केले.
Comments
Post a Comment