कामाशिवाय घराबाहेर पडू नये
लॉक डाऊन शिथिल म्हणजे संकट संपलेले नाही
बार्शीकरांनो काळजी घ्या
कामाशिवाय घराबाहेर पडू नये
माजी आमदार सोपल यांची कम्युनिटी किचनला सदिच्छा भेट
बार्शी (तालुका प्रतिनिधी) : लॉक डाऊन शिथिल म्हणजे करोना चे संकट संपलेले नाही तर लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून गरजेसाठी केलेली सोय आहे तरी बार्शीकरांनी अतिमहत्त्वाचे काम असेल तरच घराबाहेर पडावे आणि काळजी घ्यावी असे आवाहन माजी आमदार दिलीप सोपल यांनी केले सोपल यांनी आज बार्शीतील तातेड मित्र मंडळ, राजमाता इंदूताई आंदळकर आणि नाकोडा जैन मंडळाच्या कम्युनिटी किचनला सदिच्छा भेट देऊन पाहणी केली यावेळी शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर, राकेश तातेड ,प्रसन्नदाता मंडळाचे अध्यक्ष कमलेश मेहता, फुटरमल मेहता , माजी नगरसेवक वाहिद पाशा शेख,अमोल गुडे,अमोल शिंदे, बाबा माळगे, नीता, तातेड,सुनिता जाधव,सुशिल पाटील,,केदार पाटील,सनी बलदोटा,यश शहा,रोहित डुंगरवाल,नटवर काबरा,ओंकार सातारकर,संजय मंडगे,अमोल शिंदे,गणेश कुर्हाडे,किशोर कांकरिया,विकी कांकरिया,सिकंदर,अनीस शेख,बाबा माळगे,कानाडे,ओंकार चंद्रशेखर,महेश देसाई,हर्षल रसाळ,संजय पारेख आदी उपस्थित होते
सोपल पुढे म्हणाले की बार्शीला दातृत्वाचा मोठा वारसा आहे तीच परंपरा जोपासत बार्शीतील विविध मंडळाच्या वतीने कम्युनिटी किचन च्या माध्यमातून गरजू लोकांपर्यंत नियमितपणे जेवण पोहोच करण्याचा अतिशय सुंदर उपक्रम राबविला जात आहे यासाठी मदत करणारे व्यक्ती संस्था, तसेच परिश्रम घेणारे सर्वांचे मनापासून आभार मानतो असे म्हणत लोकांनी फक्त अत्यंत महत्त्वाच्या कामासाठी च घराबाहेर पडावे आणि सोशल डिस्टन्स, मास्क बाबतीत प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन केले
यावेळी भाऊसाहेब आंधळकर,राकेश तातेड कमलेश मेहता यांनी किचन आणि वितरण बाबतीत सविस्तर माहिती दिली
Comments
Post a Comment