बेकायदेशीर बांधकाम बाबतीत प्रशासनाची प्रचंड उदासीनता


बेकायदेशीर बांधकाम बाबतीत प्रशासनाची प्रचंड उदासीनता


बार्शी दि (तालुका प्रतिनिधी) बावी (आ)ता बार्शी येथील त्या गुन्हा दाखल झालेल्या बेकायदेशीर बांधकाम बाबतीत संबंधित ग्रामपंचायत, आणि सार्वजनिक बांधकाम विभागा कडून प्रचंड प्रमाणात उदासीनता दाखवण्यात आले असल्याचे दिसून येत आहे.बार्शी -तुळजापूर रोडवर बावी फाट्यावर मागील काही महिन्यापासून हे बेकायदेशीर खाजगी बांधकाम सुरू होते संचारबंदी लॉक डाऊन काळातही हे बांधकाम अगदी राजरोसपणे सुरू होते मात्र तरीही संबंधित बावी ग्रामसेवक, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी,तलाठी अथवा पोलीस पाटील आणि गावपातळीवरील दक्षता समितीने याबाबत कोणतीही नोटीस सुद्धा दिली नसल्याची माहिती  विस्तार अधिकारी गायकवाड यांनी दिली आहे सदर बांधकाम सुरू असलेली कमान कोसळून दि १२ एप्रिल रोजी झालेल्या  अपघातात महेश भारत डोळज (२७ वर्षे) रा वैराग, विकास सुग्रीव वाळके ( ३२) रा. मानेगाव, दिपक संग्राम घोलप (३२) वर्षे रा दडशिंगे अशी  व्यक्तीचा मृत्यू झाला आहे याबाबत तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मात्र सदर बेकायदेशीर बांधकाम बाबतीत कमालीची उदासीनता दाखवणाऱ्या अधिकाऱ्यांची सुद्धा चौकशी करावी अशी मागणी होत आहे.

Comments


Popular posts from this blog

कामाशिवाय घराबाहेर पडू नये

श्रीशा करंजकर हिचे यश

दैनिक 'जनसत्य'च्या बातमीच्या सत्यतेवर शिक्कामोर्तब