सहावी ते दहावीच्या विद्यार्थांचे आँनलाईन मोफत अध्यापन


 सहावी ते दहावीच्या विद्यार्थांचे आँनलाईन मोफत अध्यापन 




अक्कलकोट(शहर प्रतिनिधी :) येथील मराठा मंदिर श्री शहाजी प्रशालेच्या वतीने सर्व सहावी ते दहावीच्या विद्यार्थांचे आँनलाईन मोफत अध्यापन  केले जात असुन प्रशालेच्या या उपक्रमाचे सर्वच स्तरातुन कौतुक होत आहे.कोरोनाच्या महामारीमुळे सर्व शाळा बंद असल्याने विद्यार्थांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.सुरुवातीला दहावीच्या पाच वर्गासाठी प्रायोगिक तत्वावर हे वाँटसअप चे ग्रुप करून आँनलाईन वर्ग पंधरा दिवसापासुन सुरू करण्यात आले.विद्यार्थी व पालकां कडुन या उपक्रमाचे स्वागत केले गेल्याने उर्वरित सहावी ते नववी च्या प्रत्येक तुकडीचे वाँटसअँप ग्रुप तयार करून आँनलाईन अध्यापनासह आँडिओ , व्हिडिओ शैक्षणिक साहित्याच्या माध्यमातून अध्यापन सुरू करण्यात आले. प्रशालेचे मुख्याध्यापक ए.आर.कांबळे, उपमुख्याध्यापक एस.व्ही.भांगरे व पर्यवेक्षक आर.बी.भोसले  यांच्या नेतृत्वाखाली प्रशालेत शिकणाऱ्या इयत्ता सहावी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी व्हाट्सअप, झूम अँप, व्हिडिओ , शैक्षणिक साहित्याच्या  माध्यमातून  आँनलाईन मोफत  सर्व तुकडीचे सर्व वर्ग सुरू करण्यात आले. पालक वर्गातून प्रशालेचे या उपक्रमाचे कौतुक होत आहे. सर्व वर्गाचे तुकडीनिहाय पालकांच्या मोबाईल चे  व्हाट्सअप ग्रुप करण्यात आले.  त्या ग्रुप मध्ये संबंधित विषय शिक्षक,  प्रशासनातील मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक ,पर्यवेक्षक यांना सामील करून अभ्यासाच्या अध्यापनाचे वेळापत्रक बनवण्यात आले. त्यानुसार दररोज एक विषय या अनुषंगाने सर्व विद्यार्थ्यांना सर्व विषयाचे प्रशालेतील तज्ञ शिक्षक कडून मार्गदर्शन करण्यात येत आहे. शिक्षकांनी स्वतः व्हिडिओ तयार केले आहेत. झूम ॲपच्या मदतीने ऑनलाइन वर्ग  घेतले जात आहेत. सोशल मीडियावर ऑनलाइन उपलब्ध असलेले साहित्य,  इ-बुक पीडीएफ स्वरूपात विद्यार्थ्यांना व्हाट्सअप च्या माध्यमातून दिले आहेत. दररोज स्वाध्याय दिले जात असुन व्हाट्सअप च्या माध्यमातून त्या स्वाध्यायाचे परीक्षण केले जात आहे. प्रशालेच्या वतीने निशुल्क ऑनलाईन अध्यापन सुरू असल्याने पालक वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे मोबाईलचा सकारात्मक वापर होत असल्याबद्दल पालक समाधानी असुन या संकटकाळात यामुळे सकारात्मका वाढुन शिक्षकांचाही वेळ सत्कारणी लागत आहे. लाँकडाऊन संपले तरी या आँनलाईन अध्यापनाव्दारे मोफत अध्यापन सुरूच राहील अशी माहिती मुख्याध्यापक ए.आर.कांबळे यांनी दिली.                                       १)मुख्याध्यापक ए.आर.कांबळे- सर्व विद्यार्थांसाठी मोफतआँनलाईन वर्ग घेतले जात आहेत.पालकांचा व विद्यार्थ्यांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.शैक्षणिक   नुकसान भरून काढण्याचा प्रयत्न   आहे. २)  पर्यवेक्षक आर.बी.भोसले - शिक्षकांना वाँटसअँप ग्रुपच्या माध्यमातून  सुचना देऊन नियोजन करून आँनलाईन अध्यापन केले जात आहे.त्यामुळे शिक्षकांचाही वेळ चांगला जात आहे व विद्याथ्यांचा अभ्यासही होत आहे. ३) पालक बसवराज बिराजदार -मुलगा दहावीला आहे.काळजी वाटत होती.आँनलाईन वर्ग  सुरू झाल्याने मुलगा व्हिडिओ बगण्यात व स्वाध्याय करण्यात व्यस्त असतो.प्रशालेचा चांगला उपक्रम आहे.

Comments


Popular posts from this blog

कामाशिवाय घराबाहेर पडू नये

श्रीशा करंजकर हिचे यश

दैनिक 'जनसत्य'च्या बातमीच्या सत्यतेवर शिक्कामोर्तब