वृक्षसंवर्धनासाठी बार्शीतील पाऊणशे वर्षाच्या शेलारमामांची धडपड
वृक्षसंवर्धनासाठी बार्शीतील
पाऊणशे वर्षाच्या शेलारमामांची धडपड
भीषण उन्ह आणि लॉक डाऊन पाणी घालण्याचा प्रयत्न
बार्शी दि( संजय बारबोले) : आजच्या भीषण उन्हाळ्यात आणि लॉक डाऊन काळातही झाडं जोपासण्यासाठी बार्शीतील किसन लोखंडे उर्फ आप्पा या पाऊणशे वर्षाच्या शेलारमामांची धडपड म्हणजे तरुणांसाठी एक प्रकारची प्रेरणाच आहे वृक्ष लागवड आणि संवर्धनाची बार्शीला मोठी परंपरा आहे स्व वायूपुत्र नारायणराव जगदाळे ,रवी फाउंडेशन,पक्षनेते विजय राऊत, वृक्ष संवर्धन समिती आदींच्या माध्यमातून बार्शीत वृक्ष संवर्धनासाठी मोठ्या प्रमाणात चळवळ सुरू आहे त्याचाच एक भाग म्हणून आमदार राजेंद्र राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली बाजार समिती ने संपूर्ण आवारात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करून ट्री गार्ड तसेच पाण्याची सोय केलेली आहे अशाच काही झाडांना पंच्याहत्तर वर्षाचे लोखंडे आप्पा नियमितपणे पाणी घालत आहेत लोखंडे हे आडत दुकानात मुनीम म्हणून काम करत आहेत मात्र त्यांची झाडं जगवण्यासाठी ची धडपड निश्चितच सर्वांसाठी प्रेरणादायी अशी आहे अशा शेलारमामा मुळे भविष्यात नक्कीच ही सर्व झाड मोठ्या दिमाखात मोठी होणार यामध्ये आता कोणतीही शंका नाही
Comments
Post a Comment