कुर्डूवाडीत भाजपाच्या वतीने अटल भोजन उपक्रमाची सुरुवात
कुर्डूवाडी प्रतिनिधी : कोरोना सारख्या व्हायरल आजारामुळे लाॅकडाऊनच्या काळात जगच बंद पडल्याने गोरगरीबांना कामधंदा नसल्याने,मजुरी मिळेना. जेव्हा काम करू तेंव्हाच खायला मिळेल अशा लोकांची सोय करण्याच्या हेतूने अटल भोजनाची सुरुवात भारतीय जनता पार्टीचे तालूकाध्यक्ष संजयदादा टोणपे यांच्या वतीने करण्यात आली
यामध्ये लाॅकडाऊनच्या काळत रोज किमान दिडशे ते दोनशे लोकांना कुर्डूवाडी शहर व आसपासच्या गोरगरीब, श्रमीक,कामगार,अनाथ अशा लोकांना जेवण पुरविण्यात येणार आहे
या अटल भोजन उपक्रमाची सुरुवात भारतीय जनता पार्टीचे प्रांतीय सदस्य गोवींद कुलकर्णी, माजी नगराध्यक्ष राजेंद्र पारखे यांच्या हस्ते करण्यात आली.यावेळी संजयदादा टोणपे प्रकाश किर्वे,मोहन गायकवाड,योगेश उघाडे,सौरभ परबत,जोतिराम आवारे,रामभाऊ वाघमारे,दत्ता लोखंडे,सूर्यकांत पाटील,बालाजी लूक्कडओंकार म्हस्के,प्रदीप कापरे,स्वप्नील तेली,महेश जानराव,सिद्धू कांबळे,सौमीत्र परबत,गणेश पवार हे उपस्थित होते.
या उपक्रमात रोज श्रद्धा केटरिंगचे सचीन परबत,अथर्व हाॅटेलचे कुक सुदन क्षेत्री (कांच्या), धनाजी माने, सौ शोभा जंजीरे हे विनामूल्य जेवण बनवण्याची सेवा करीत आहेत.
Comments
Post a Comment