सोलापुरात एका दिवसात सापडले 21 रुग्ण ,रुग्णांची संख्या 102 झाली
सोलापुरात 102 रुग्ण कोरोनाबाधित असून त्यापैकी सहा जणांचा मृत्यू झालेला आहे. सोलापुरात कोरोना चाचणीची संख्या अधिक असल्याने अधिक रुग्ण सापडत आहेत.
सोलापूर : सोलापूर शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 102 झाली असून आज (गुरुवारी) एका दिवसात 21 जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले, अशी माहिती सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. खरीप हंगाम आढावा बैठकीसाठी पालकमंत्री भरणे आज सोलापूरच्या दौऱ्यावर आले आहेत.
Comments
Post a Comment