निलेगाव येथे किराणा मालाचे किट व भाजीपाला वाटप


निलेगाव येथे किराणा मालाचे किट व भाजीपाला वाटप 




नळदुर्ग :-  तुळजापूर तालुक्यातील निलेगाव येथे सौर ऊर्जेच्या टॉवरचा काम करणाऱ्या पश्चिम बंगाल येथील मजुरांची कोरोनाच्या संकटकालीन परिस्थितीमध्ये लाॅकडाऊन असल्याने उपासमार होऊ नये म्हणून ग्रामपंचायत कार्यालय निलेगाव व पोलीस पाटील मधुकर चव्हाण यांच्या वतीने 29 एप्रिल रोजी किराणा मालाचे किट व भाजीपाला  वाटप करण्यात आले यावेळी सरपंच नुरजहा सौदागर  कोरोना सहायता कक्ष प्रमुख  नाबदे मॅडम, पोलिस पाटील मधुकर चव्हाण , ग्रामसेवक संजय माशाळे डॉ. शफिक रिसालदार ,सामाजिक कार्यकर्ते बसवराज जमादार, रफिक पटेल व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते

Comments


Popular posts from this blog

कामाशिवाय घराबाहेर पडू नये

श्रीशा करंजकर हिचे यश

दैनिक 'जनसत्य'च्या बातमीच्या सत्यतेवर शिक्कामोर्तब