महात्मा बसवेश्वरांच्या जयंतीनिमित्त किराणा मालाचे वाटप
महात्मा बसवेश्वरांच्या जयंतीनिमित्त किराणा मालाचे वाटप
कोरवली येथील शिव बसव जन्मोत्सव समितीचा अनोखा उपक्रम
कामती ( प्रतिनिधी ) जगत् ज्योती महात्मा बसवेश्वर महाराजांच्या ८८९ जयंतीनिमित्त मोहोळ तालुक्यातील कोरवली येथील शिवबसव जन्मोत्सव समितीच्या वतीने गावातील ७० गरीब व गरजू व्यक्तींना किराणा मालाचे तसेच २५० सॅनेटायझरचे मोफत वाटप करण्यात आले. यावेळी मोहोळचे तहसीलदार जीवन बनसोडे, कामती पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण उंदरे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. या वाटपाचे आयोजन शिवा संघटनेचे सोलापूर जिल्हा संघटक व मंडळाचे मार्गदर्शक सिध्दाराम म्हमाणे यांनी केले होते.कोरवली येथील शिवबसव जन्मोत्सव समितीच्या वतीने महात्मा बसवेश्वर महाराज व छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती प्रत्येक वर्षी मोठ्या उत्साहात साजरी केली जात होती. परंतु यावर्षी या संसर्गजन्य विषाणूच्या महामारी मुळे शासनाच्या आदेशान्वये सार्वजनिक जयंती साजरी केले गेले नाही. जयंतीचा यावर्षीचा खर्च टाळून समितीच्यावतीने ७० गरीब व गरजू व्यक्तींना अत्यावश्यक किराणा मालाचे वाटप करण्यात आले. तसेच ग्रामपंचायत कर्मचारी, आशा वर्कर, दूध संकलन केंद्र येथे २५० सॅनेटायझरचे वाटप करण्यात आले. यात प्रत्येकी गोडेतेल, शेंगदाणे, साखर, चहा पावडर, लाईफबॉय साबण, रिन साबण, निरमा पावडर, तुरडाळ, मसूरडाळ, गुळ, मिठ, पोहे आदी अत्यावशक किराणा साहित्य उपलब्ध करून देण्यात आले.यावेळी शिवानंद म्हमाणे, बाळासाहेब कस्तुरे, पुरूषोत्तम राजमाने, डिगंबर मुरगुंडे, भारत कोरे, सागर माळगोंडे आदी उपस्थित होते.
Comments
Post a Comment