बार्शीच्या कर्तव्यदक्ष प्रशासनामुळे त्या पॉझिटिव्ह व्यक्तीचा काही तासांत छडा
बार्शीच्या कर्तव्यदक्ष प्रशासनामुळे
त्या पॉझिटिव्ह व्यक्तीचा काही तासांत छडा
बार्शी दि (तालुका प्रतिनिधी) तहसीलदार प्रदीप शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली बार्शीच्या पोलीस,आरोग्य आणि नगरपालिका प्रशासनाने वसमत जि हिंगोली येथील त्या पॉझिटिव्ह व्यक्ती बार्शीत आले नसल्याचा तपास केला आहे त्यामुळे काही वेळ टेन्शन घेतलेल्या बार्शीकरांनी सुटकेचा श्वास सोडला
वसमत येथील एक करोना बाधित द्राक्षे व्यापारी बार्शीतून आला असल्याची माहिती हिंगोली जिल्हा प्रशासनाने जाहीर केली होती त्यामुळे काल बुधवारी दुपारी तीन वाजले पासून शहरातील भवानी पेठेत आरोग्य विभाग, नगरपालिका आणि पोलिसांनी तळ ठोकून या भागात फवारणी तसेच सदर व्यक्ती ज्या ठिकाणी राहत होता त्या ठिकाणच्या लोकांची चौकशी, तपासणी करून पॉझिटिव्ह व्यक्ती च्या संपर्कात आलेल्या व्यक्ती चा शोध सुरू केला होता या चौकशीत भवानी पेठेत सध्या नऊ द्राक्षे व्यापारी राहत असल्याची माहिती मिळाली त्यावरून त्या पॉझिटिव्ह व्यक्ती चा तपास केला असता तो यापूर्वी कधीही बार्शीत आला नसल्याची माहिती पुढे आली त्यामुळे पॉझिटिव्ह व्यक्ती ने वसमत प्रशासनाला चुकीची माहिती दिली हे स्पष्ट झाले त्यामुळे बार्शीकरांनी घाबरू नये मात्र काळजी घ्यावी असे आवाहन तालुका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले या संपूर्ण प्रकरणात तहसीलदार प्रदीप शेलार, पोलीस उपअधीक्षक डॉ सिध्देश्वर भोरे, नगरपालिकेचे मुख्याधिकारी शिवाजी गवळी, पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी, तालुका वैद्यकीय अधिकारी संतोष जोगदंड ,स पो नि बबन येडगे,आरोग्य अधिकारी डॉ विजय गोदेपुरे यांची भूमिका मोलाची ठरली आहे
Comments
Post a Comment