विरोधी पक्षनेते अक्कलकोटे यांच्या पुढाकाराने नागरिकांची तपासणी
विरोधी पक्षनेते अक्कलकोटे यांच्या पुढाकाराने नागरिकांची तपासणी
बार्शी दि (तालुका प्रतिनिधी) बार्शी नगरपालिकेचे विरोधी पक्षनेते नागेश अक्कलकोटे यांच्या पुढाकाराने शहरातील प्रभाग क्रमांक नऊ मधील नागरिकांची तपासणी करण्यात आली यावेळी मुख्याधिकारी शिवाजी गवळी,आरोग्य अधिकारी डॉ विजय गोदेपुरे, स्वच्छता निरीक्षक मनोज खरात,मिळकत विभाग प्रमुख महादेव बोकेफोडे,बाळासाहेब गुंड,कुलकर्णी व नागरिक उपस्थित होते
करोनाच्या पार्श्वभूमीवर थर्मल स्कॅनर मशिन च्या सहाय्याने वार्डातील नागरिकांची घरोघरी जाऊन तपासणी करून करोना विषाणू बाबतीत जनजागृती करण्यात आली तसेच नगरपालिकेच्या वतीने शहरात घरोघरी जाऊन आरोग्य सर्वेक्षण करून विशिष्ट नमुन्यात सर्व कुटुंबाची माहिती संकलित करून आजारी नागरिकांची तपासणी करावी असे मत अक्कलकोटे यांनी व्यक्त केले तसेच यावेळी अक्कलकोटे यांनी सर्वेक्षण फॉर्म चा नमुना ही मुख्याधिकारी गवळी यांचेकडे दिला.
Comments
Post a Comment