बार्शीत निवडक किराणा दुकानदारांकडून लॉक डाऊन मर्यादेचेउल्लंघन
बार्शीत निवडक किराणा दुकानदारांकडून
लॉक डाऊन मर्यादेचेउल्लंघन
बार्शी दि (तालुका प्रतिनिधी) बार्शीतील काही निवडक किराणा दुकानदारांकडून सोशल डिस्टन्स बरोबरच आता लॉक डाऊन वेळेचे उल्लंघन होत असल्याचे दिसून आले
करोना संसर्ग रोखण्यासाठी बार्शी नगरपालिकेने अत्यावश्यक सेवा म्हणून किराणा, भाजीपाला, दूध पेट्रोल पंप बाबतीत गर्दी टाळण्यासाठी सुधारित वेळापत्रक दिले आहेत्याप्रमाणे दुपारी दोन वाजता किराणा दुकान बंद करणे अपेक्षित आहे मात्र काही किराणा दुकानदार लोडिंगच्या नावाखाली दुपारी तीन चार वाजेपर्यंत विक्री सुरू ठेवतात त्यामुळे शहरात गर्दी होत आहे तरी अशा दुकांदारावर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी होत आहे
Comments
Post a Comment