बार्शीच्या पाणी पुरवठ्याला महावितरणचा शॉक ; एकाच दिवशी तीन ठिकाणी घोटाळा

बार्शीच्या पाणी पुरवठ्याला महावितरणचा शॉक
एकाच दिवशी तीन ठिकाणी घोटाळा
बार्शी दि (तालुका प्रतिनिधी) बुधवारी एकाच दिवशी तीन ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाल्याने बार्शी,शहरातील पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे.काल बुधवारी सकाळी दहा ते साडेअकरा या वेळेत बार्शीतील वीज पुरवठा खंडित झाला तर दुपारी बारा वाजलेपासून कंदर आणि सायंकाळी सहा वाजेपर्यंत कुर्डुवाडी येथील वीज खंडित झाला होता त्यामुळे बार्शीच्या पाणी पुरवठ्यावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला सरासरी दररोज एक कोटी नव्वद हजार लिटर पाण्याचे पंपिंग होते मात्र काल पम्पिंग वर परिणाम झाला त्यामुळे आज शहरातील काहीभागाला उशीराने तर काही भागात गॅप पडला आहे मात्र उद्या सकाळी पूर्ववत पाणी पुरवठा होईल अशी माहिती जलदाय अभियंता अजय होनखांबे यांनी दैनिक जनसत्य बरोबर बोलताना दिली
Comments
Post a Comment