टेन्शन वाढलं! देशात १८२३ नवे करोना रुग्ण, २४ तासात ६७ मृत्यू
टेन्शन वाढलं! देशात १८२३ नवे करोना रुग्ण, २४ तासात ६७ मृत्यू
देशभरातील करोनाग्रस्तांची संख्या ३३ हजार ६१० झाली आहे

देशभरात १८२३ नवे करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तर मागील २४ तासात ६७ जणांचा मृत्यू झाला आहे. आता देशभरातील करोनाग्रस्तांची संख्या ३३ हजार ६१० झाली आहे. यापैकी ८ हजार २७३ रुग्णांना आत्तापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आत्तापर्यंत करोनाची लागण होऊन १ हजार ७५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने ही माहिती दिली आहे
देशात करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी १४ एप्रिलपर्यंत जाहीर करण्यात आलेला लॉकडाउन ३ मे पर्यंत वाढवण्यात आला. यापुढे काय उपाय योजना करायच्या तेदेखील स्पष्ट होईल. तूर्तास भारतात रुग्णांची वाढती संख्या हा चिंतेचा विषय झाला आहे.
Comments
Post a Comment