करोनाबाधित पत्रकाराच्या संपर्कात ४ मंत्री, 'सेल्फ क्वारंटाईन'चा निर्णय
करोनाबाधित पत्रकाराच्या संपर्कात ४ मंत्री, 'सेल्फ क्वारंटाईन'चा निर्णय

बंगळुरू : कर्नाटक सरकारच्या चार मंत्र्यांनी स्वत:ला क्वारंटाईन करण्याचा निर्णय घेतलाय. स्थानिक चॅनलचा एक व्हिडिओ जर्नलिस्ट करोनाबाधित असल्याचं आढळलंय. आपण त्याच्या संपर्कात आलो होतो, हे लक्षात आल्यानंतर हे मंत्री आपापल्या घरातच क्वारंटाईन झाले आहेत...सोशल मीडियावरून या मंत्र्यांनी ही माहिती दिली आहे. यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री डॉक्टर अश्वत नारायण यांचादेखील समावेश आहे.स्थानिक मीडियाचा एक व्हिडिओ जर्नलिस्ट २४ एप्रिल रोजी करोनाबाधित असल्याचं स्पष्ट झालं होतं. हा पत्रकार २१ ते २४ एप्रिलपर्यंत या मंत्र्यांच्या संपर्कात होता.उपमुख्यमंत्री डॉ.अश्वत नारायण यांच्याशिवाय राज्याचे गृह मंत्री बसवाराज बोम्मई, आरोग्य मंत्री डॉक्टर सुधाकर आणि पर्यटन मंत्री सी टी रवि यांनी स्वत:ला क्वारंटाईन केलंय. या चारही मंत्र्यांनी आपली करोना चाचणी करवून घेतलीय. या चाचणीचा निकाल 'निगेटिव्ह' आला आहे. परंतु, सावधानता म्हणून नियमाप्रमाणे १४ दिवसांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण करूनच बाहेर पडण्याचा निर्णय त्यांनी ट्विटरवरून जाहीर केलाय.कर्नाटकमध्ये आत्तापर्यंत ५३२ करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यातील २० जणांनी आपले प्राण गमावले आहेत.
Comments
Post a Comment