पोलीसांना हेल्मेट कीटचे वाटप



पोलीसांना हेल्मेट
 कीटचे वाटप



मोहोळ,(तालुका प्रतिनिधी): कोरोना विषाणुच्या संसर्गापासुन पोलीसांना अधिक सुरक्षितता प्राप्त होण्यासाठी जिजाऊ बिग्रेडच्या तालुकाध्यक्षा शुभांगी लंबे( माने ) यांनी पोलीसांना हेल्मेट कीटचे वाटप केले .
 मोहोळ तालुक्यामध्ये प्रशासनाच्या आदेशानुसार नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस अतिशय जबाबदारीने कायदा व सुव्यवस्था हाताळत आहेत .परिणामी नागरिकांच्या आरोग्याची  काळजी घेणाऱ्या  पोलीसांच्याही आरोग्याची काळजी घेत मोहोळ तालुका जिजाऊ बिग्रेडच्या तालुकाध्यक्षा शुभांगी लंबे (माने) यांनी स्वखर्चाने मोहोळ पोलीस ठाण्यातील सर्व कर्मचाऱ्यांना हेल्मेट किटचे वाटप केले . या प्रसंगी  पोलीस निरीक्षक सुर्यकांत कोकणे , सहाय्यक पो.नि. बाडीवाले , इंगळे , यांच्यासह संतोष गायकवाड , माने सर , किरण गायकवाड पोलीस कर्मचारी  निलेश देशमुख , मुन्ना बाबर , अभिजित घाटे , शरद डावरे ,हरिभाऊ चौधरी,  आदीसह बहुसंख्य कर्मचारी उपस्थित होते .

Comments


Popular posts from this blog

कामाशिवाय घराबाहेर पडू नये

श्रीशा करंजकर हिचे यश

दैनिक 'जनसत्य'च्या बातमीच्या सत्यतेवर शिक्कामोर्तब