कोरोनाच्या भीतीने टेंभुर्णीत शुकशुकाट
कोरोनाच्या भीतीने टेंभुर्णीत शुकशुकाट टेंभुर्णी (प्रतिनिधी) कोरोनाच्या भीतीने टेंभुर्णीत शुकशुकाट पाहायला मिळाला.कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून संपूर्ण राज्यात संचारबंदी लागू करण्यात आलीय.अत्यावश्यक वगळता सर्व दुकानेदेखील बंद करून घरात बसावे,असे आदेश प्रशासनाकडून देण्यात आलाय.कोरोना आजाराच्या भितीमुळे ग्राहक बाजारात खरेदीसाठी येणेच टाळत आहे.सोमवार दि.३० रोजी टेंभुर्णी परिसरातील एस टी स्टॅन्डसह,इतर भागात मोठा शुकशुकाट पहायला मिळाला.ज्या ठिकाणी दिवसभर नेहमीच नागरिकांची गर्दी दिसायची तिथे एकाही व्यक्ती दिसले नाही.नागरिकांच्या मनात कोरोना व्हायरसबाबत भीती निर्माण झाली आहे.नागरिक फक्त काम असले तरच घराबाहेर पडत आहे.बाजारपेठेत मंदीचे सावट तर रस्त्यांवर शुकशुकाट दिसून आला.गेल्या काही दिवसांपासून ग्राहकांनी पाठ फिरविल्यामुळे व्यापारीही धास्तावले आहेत.मुख्य बाजारपेठ असलेल्या मेनरोडसह परिसरातील मोठ-मोठी दुकाने ओस पडल्याचे चित्र सध्या पहायला मिळत आहे.गर्दी टाळण्यासाठी अत्यावश्यक गरजेच्या गोष्टी वगळता,अन्य वस्तूंची खरेदी पुढे ढकलण्याचा पर्याय नागरिकांकडून स्वीकारला जाताना दिसत आहे.