डिव्हीपी समूहाची सामाजिक बांधिलकीची परंपरा कायम
डिव्हीपी समूहाची सामाजिक बांधिलकीची परंपरा कायम
पंढरपूर प्रतिनिधी:कोणत्याही सामाजिक कार्यात सर्वात अग्रेसर समूह अशी ओळख असलेल्या पंढरीतील डिव्हीपी(कै.धनंजय विठ्ठल पाटील)समूहाने आजवर अनेक मोठं मोठे उपक्रम राबवत आपली सामाजिक बांधीलकी जपली आहे.मग अनाथांसाठी जेवण असो की वृद्ध निराधारांना मदतीचा हात असो,अंधांना आधार असो की अनाथ मुलांना मोफत सिनेमा दाखविणे असो.आजवर या समूहाने हजारो जणांना मदतीचा हात देत उद्योग समूह कसा असावा याचे आदर्श उदाहरण घालून दिले आहे.त्यातच सोमवारी ३० मार्च रोजी आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.जगभरात कोरोनाने (कोविड-१९) थैमान घातल्याने एकीकडे जग भयभीत झाले आहे.भारतातही याचा शिरकाव झाल्याने याचा फैलाव रोखण्यासाठी सरकारने संपूर्ण लॉकडाऊन घोषित केले आहे.त्यामुळे पोलिसांना दिवसरात्र आपल्या कामासाठी झटावे लागत आहे.अशा कठीण काळात त्यांना चांगले जेवण मिळावे व पोलिसांची मदत करून कार्याला सलाम करता यावा याकरता डिव्हीपी उद्योग समूहाने पंढरीतील डॉक्टर,नर्सेस,पोलीस प्रशासन,महसूल अधिकारी,कर्मचारी व पत्रकार मित्र यांच्याकरता मोफत नाष्टा व जेवणाची सोय उपलब्ध करून दिली आहे.जोपर्यंत हा लॉकडाउन सुरू राहणार आहे तोपर्यंत डॉक्टर,नर्सेस, पोलीस प्रशासन,महसूल अधिकारी,कर्मचारी,पत्रकार मित्र यांना जेवण देण्याचा विचार असल्याचा मानस या ग्रुपचे प्रमुख अभिजीत पाटील यांनी काल याच्या शुभारंभ प्रसंगी बोलताना व्यक्त केला.डीव्हीपी उद्योग समुहाचे प्रमुख व सुप्रसिध्द उद्योजक अभिजीत पाटील यांनी कोरोना विषाणुच्या संकटकाळात रात्रंदिवस प्रामाणिकपणे सेवा बजावणार्या डॉक्टर, नर्सेस, पोलीस, महसुल अधिकारी,कर्मचारी व पत्रकारांना नाष्ट्यासह दोन वेळच्या जेवणाची सोय उपलब्ध करुन दिली आहे.त्यांच्या या प्रशंसनीय कार्याबाबत सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.
यावेळी बोलताना अभिजीत पाटील म्हणाले की, जगाप्रमाणे आपल्या देशावर आलेल्या कोरोनाच्या संकटावर आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी,महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे अहोरात्र कष्ट घेत आहेत.तसेच डॉक्टर,नर्सेस, पोलीस प्रशासन,महसूल अधिकारी,कर्मचारी, पत्रकार मित्र आपले कर्तव्य बजावत आहेत, आपले कर्तव्य म्हणून डी.व्ही.पी. उद्योग समुहाकडुन ‘फुल ना फुलाची पाकळी’ असा सहयोग देत आहोत. पंढरपूर मधील हॉटेल विठ्ठल कामत मधुन सकाळी 10 ते रात्री 8 पर्यंत नास्ता, दुपारचे जेवण व रात्रीचे जेवणाचे पार्सल कृपया इथून घेऊन जावे असे आवाहन त्यांनी केले आहे.यावेळी पंढरपुरचे प्रांताधिकारी सचिन ढोले,उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.सागर कवडे,पंढरपूर शहर पोलीस निरीक्षक अरुण पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
Comments
Post a Comment