सरकारचा मोठा दिलासा; ७० हजार बेघरांना निवारा

सरकारचा मोठा दिलासा; ७० हजार बेघरांना निवारा



मुंबई: करोनाचं राज्यावरील संकट अधिक गहिरं होत आहे. राज्यात संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. अशा परिस्थितीत हजारो बेघर लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांच्या निवासाचा, उदरनिर्वाहाचा प्रश्न आ वासून उभा राहिला आहे. परराज्यातील हजारो मजूर त्यांच्या गावी जायला निघाले आहेत. मात्र, सरकारनं या बेघर लोकांना मोठा दिलासा दिला आहे. राज्यभरात त्यांच्यासाठी २६२ मदत केंद्रे उभारली आहेत. तर ७० हजारांहून अधिक स्थलांतरित कामगार आणि बेघर लोकांच्या निवाऱ्याची सोय केली आहे.

राज्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. करोनामुळं मृतांची संख्या आणि करोनाग्रस्तांचा आकडा दिवसागणिक वाढत आहे. या जीवघेण्या करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकार अनेक निर्बंध उपाय करत आहे. राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. राज्यातील कामगार, मजूर आणि बेघरांना स्थलांतर करण्यापासून रोखले जात आहे. ही कठोर पावलं उचलतानाच, राज्य सरकारनं या बेघर लोकांना मोठा दिलासा दिला आहे. राज्य सरकारनं या बेघर लोकांसाठी २६२ मदत केंद्रे उभारली आहेत. या माध्यमातून ७० हजार ३९९ लोकांसाठी निवारा केंद्रांची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यांच्या जेवणाची व्यवस्थाही केली जात आहे. करोना संकटामुळं लॉकडाऊन करण्यात आलं आहे. या परिस्थितीत राज्याबाहेरील व स्थलांतरित कामगार / बेघर अशा ७०,३९९ लोकांना अन्न आणि आश्रयासाठी ही केंद्रे उपलब्ध करून देत आहे, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ट्विटरद्वारे दिली.

Comments


Popular posts from this blog

कामाशिवाय घराबाहेर पडू नये

श्रीशा करंजकर हिचे यश

दैनिक 'जनसत्य'च्या बातमीच्या सत्यतेवर शिक्कामोर्तब