मुंबई: चेंबूर पोलीस ठाण्यात पोलिसाची आत्महत्या
मुंबई: चेंबूर पोलीस ठाण्यात पोलिसाची आत्महत्या

मुंबई: चेंबूर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संपत गाढवे (५८) यांनी पोलीस ठाण्यातील भंडारगृहात गळफास लावून आत्महत्या केली. आज दुपारी पोलिस ठाण्यातील हवालदार ड्युटीवर आले. त्यावेळी हा प्रकार उघडकीस आला.
गाढवे यांना घशाचा कर्करोग होता. फेब्रुवारी २०१९ मध्ये त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. घटनास्थळी चिठ्ठी सापडली असून यामध्ये आजाराला कंटाळून जीवन संपवित असून यासाठी कुणालाही जबाबदार धरू नये, असे गाढवे यांनी नमूद केले आहे. चेंबूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आजारी असलेल्या गाढवे यांना भंडारगृहाची ड्युटी देण्यात आली होती. तिथंच त्यांनी गळफास घेतला. ही घटना घडली तेव्हा बहुतेक सर्व पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी बाहेर गेलेले होते. गाढवे यांना तात्काळ जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र, त्यांचा आधीच मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. गाढवे यांच्या मागे पत्नी व दोन मुले असा परिवार आहे. चेंबूर पोलिसांनी या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.
मुंबई पोलीस सध्या करोना विषाणूमुळं निर्माण झालेल्या परिस्थितीचा सामना करत आहेत. सर्वसामान्य मुंबईकर सुरक्षित घरात बसलेले असताना पोलीस जिवाची पर्वा न करता सेवा बजावत आहेत. लॉकडाऊनची काटेकोर अंमलबजावणी करत आहेत. त्यामुळं त्यांच्यावर प्रचंड ताण आहे. अनेक ठिकाणी पोलिसांवर हल्ल्याचेही प्रकार घडले आहेत. हे सगळं सुरू असतानाच ही बातमी आल्यानं हळहळ व्यक्त होत आहे.

Comments
Post a Comment