तांदूळ, गहू आट्टा, तुरदाळ, तिखट, तेल, जिरे, मोहरी, पापड असे किराणा संस्थेच्या निधीतून वाटप
नळदुर्ग : कोरोना मुळे निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीत आरंभ सामाजिक संस्था यांच्या वतीने नळदुर्ग शहरात असलेले निराधार, रोजच्या कमाईतून पोट भरणारे तसेच हातावर पोट असलेले मजूर, परराज्यातून कमावून खाण्यासाठी आलेले नागरिक यांना तांदूळ, गहू आट्टा, तुरदाळ, तिखट, तेल, जिरे, मोहरी, पापड असे किराणा संस्थेच्या निधीतून वाटप करण्यात आले.
मध्यप्रदेश व राजस्थान येथून भेळ पाणीपुरी विकुन आपले पोट भरण्यासाठी नळदुर्ग शहरातील माऊली नगर येथे वास्तव्यास आहेत गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण देशात लॉकडाउन असल्याने धंदा बंद करून घरी बसावे लागत आहे अजून काही दिवस असेच चालू राहिले तर खाण्यापिण्याची सोय होणार नाही तसेच येथील रेशनकार्ड नसल्याने शासनाची मदत देखील मिळेल की नाही ही चिंता आणि त्यावरून कोरोनाची भीती असल्याने आपल्या मूळगावी जाण्याची घाईत होते, आरंभ बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने अशा कुटुंबाना किराणा मालाची सोय करण्यात आली, तसेच राज्य व केंद्र शासनाने जिथे आहात तिथे राहण्याचे आवाहन केले आहे त्यामुळे त्यांना काही लक्षणे आहेत का याची विचारपूस करून त्यांना ताप आहे का यासाठी संपूर्ण कुटुंबियांच्या शरीराच्या तापमानाची डॉ. जितेंद्र पाटील यांच्या मदतीने इन्फ्रारेड थर्मामिटर च्या सहाय्याने मोफत तपासणी करण्यात आली व त्यांना कोणत्याही प्रकारची भीती बाळगू नये असे सांगितले. तसेच नळदुर्ग शहरातील नागरिकांनी हातावर पोट असणाऱ्या किमान एका कुटुंबाला मदत करावी आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले.
यावेळी डॉ. जितेंद्र पाटील, संस्थेचे अध्यक्ष राहुल हजारे, उपाध्यक्ष विशाल डुकरे, सचिव श्रमिक पोतदार, कोषाध्यक्ष सागर हजारे, प्रसिद्धीप्रमुख आयुब शेख, मयूर महाबोले, सुजय बिस्वास आदी उपस्थित होते.
Comments
Post a Comment