कोविड-१९ धोरणाबाबत रतन एन टाटा यांचे निवेदन
कोविड-१९ धोरणाबाबत रतन एन टाटा यांचे निवेदन
सोलापूर (प्रतिनिधी) भारतात आणि जगात सर्वत्र परिस्थिती अतिशय गंभीर बनली आहे आणि
यावेळी तातडीने कृती करणे गरजेचे आहे.टाटा ट्रस्ट्स आणि टाटा ग्रुपच्या कंपन्यांनी याआधी देखील
गरजेच्या प्रत्येक वेळी देशाची मदत केली आहे.भारतातील नामांकित उद्योग समूह असलेल्या टाटा ग्रुपने कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी ५०० कोटींची मदत जाहीर केली आहे.आजवरच्या सर्वात गंभीर समस्यांपैकी एक कोविड १९ विरोधातील लढाईसाठी आवश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी तात्काळ आपत्कालीन साधने तैनात करणे गरजेचे आहे.टाटा ट्रस्ट्स,टाटा सन्स आणि टाटा समूहातील कंपन्या आपल्या स्थानिक व जागतिक सहयोगी आणि सरकार यांच्यासोबत मिळून वंचित लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या एका संयुक्त सार्वजनिक आरोग्य सहयोग मंचावर या संकटाविरोधात लढत आहेत.या आजाराविरोधात लढण्यासाठी आपले जीवन आणि आपली सुरक्षा धोक्यात घालून काम करत असलेल्या सदस्य संघटनांमधील प्रत्येक व्यक्तीबद्दल आमच्या मनात अतिशय सन्मान व कृतज्ञता आहे आणि आम्ही त्यांचे मनःपूर्वक आभारी आहोत.
टाटा ट्रस्ट्स, सर्व संकटग्रस्त समुदायांची सुरक्षा आणि सबलीकरणाची आपली प्रतिज्ञा कायम
राखत ५०० कोटी रुपये पुढील कामांसाठी बांधील करत आहे –
फ्रंटलाईनवर कार्यरत असलेल्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी व्यक्तिगत सुरक्षा उपकरण
वाढत असलेल्या केसेसच्या उपचारांसाठी श्वसन प्रणाली (रेस्पिरेटरी सिस्टिम्स)
प्रत्येक व्यक्तीची तपासणी करता येईल इतपत टेस्टिंगची क्षमता वाढवण्यासाठी टेस्टिंग किट्स
संसर्ग झालेल्या रुग्णांसाठी मॉड्युलर उपचार सुविधा निर्माण करणे
आरोग्य कार्यकर्ता आणि सर्वसामान्य जनतेपर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी व्यवस्थापन आणि
प्रशिक्षण
Comments
Post a Comment