गुटखा साठवणूक व विक्री प्रकरणी दोघांवर तर पाच जणांवर जुगाराचा गुन्हा
गुटखा साठवणूक व विक्री प्रकरणी दोघांवर तर पाच जणांवर जुगाराचा गुन्हा
पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल
पंढरपूर प्रतिनिधी:राज्यात संचारबंदी लागू असतानाही दुचाकीवरून फिरणाऱ्या चार जणांवर कलम १८८ प्रमाणे संचारबंदी उल्लंघनचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यामध्ये १.कमलाकर दिनकर गोफणे(देगाव ता.पंढरपूर),२.महेश कुबेर पवार (शिरभावी ता.सांगोला),३.धनाजी शंकर भातुगडे(शिरभावी ता.सांगोला) अन्य एक अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तर संचारबंदी व जमावबंदी लागू असतानाही जुगार(तीन पानी तिरट)खेळताना ६००० रुपयांच्या मुद्देमालासह कोंढारकी ता.पंढरपूर येथे १.जालिंदर विष्णू थिटे(रा.अनगर ता.मोहोळ),२.बापू भास्कर दांडगे, (कोंढारकी),३.मच्छीन्द्र ताड(एकलासपूर ता.पंढरपूर),४.रवींद्र शंकर दांडगे (कोंढारकी),५.शिवाजी सोपान पाटील (कोंढारकी) व ६.अनिल कापसे (कोंढारकी) यांच्यावर तीन पानी जुगार खेळताना रंगेहाथ पकडून कलम १८८ व जुगार प्रतिबंधक कायदा व साथीचा रोग प्रतिबंधक कायद्यानुसार पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तसेच बंदी असतानाही गुटखा साठवण केल्याप्रकरणी बंडू हणमंत लवटे व सोमनाथ पोपट लवटे(रा.निजामपूर ता.सांगोला) या दोघांच्या विरोधात बंदी असतानाही गुटखा वाहतूक व साठवणूक केल्याप्रकरणी अन्न सुरक्षा अधिनियम व संचारबंदी उल्लंघन कलम १८८, २७२,२७३ व ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Comments
Post a Comment