जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी 300 हून अधिक गुन्हे दाखल
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी 300 हून अधिक गुन्हे दाखल
सोलापूर (प्रतिनिधी) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोलापुरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये दिलेल्या आदेशांचे उल्लंघन केल्याप्रकरणी सोलापूर ग्रामीण पोलिसांनी 300 हून अधिक गुन्हे दाखल केले आहेत. यामध्ये जवळपास 864 लोकांवर कारवाई करण्यात आली आहे. तर संचारबंदी लागू असताना कोणत्याही कारणाविना फिरणाऱ्या लोकांचे थेट वाहनच पोलिसांनी जप्त केले आहे. जवळपास 43 वाहने आतापर्यंत सोलापूर ग्रामीणच्या पोलिसांनी जप्त केली आहेत. 23 मार्चपासून आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार 511 तर मोटार व्हेईकल ऍक्टनुसार 4471 वाहनचालकांवर सोलापूर शहर पोलिसांनी कारवाई केली आहे. राज्यभरात संचारबंदी लागू असल्याने लोकांनी अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडू नये असे आवाहन पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी केले आहे. दरम्यान दुचाकी वाहनावर अत्यावश्यक कारणासाठी बाहेर पडताना लोकांनी एका गाडीवर एकट्यानेच बाहेर पडावे, अशा सूचना पोलिसांनी केल्या आहेत.
Comments
Post a Comment