निराधार करिता निवारा कक्ष ; करमाळा नगरपालिकेचा उपक्रम
करमाळा (प्रतिनिधी) कोरणा विषाणूजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर करमाळा शहरातील निराधारांसाठी नगरपालिकेच्या वतीने निवारा कक्षाची स्थापना करण्यात आली असल्याची माहिती मुख्याधिकारी विना पवार यांनी दिली अधिक माहिती देताना त्या म्हणाल्या कि, निराधार लोकांची सोय होत नसल्याचे लक्षात आल्याने करमाळा नगरपालिकेच्या वतीने जुनी नगरपालिका कार्यालय व महात्मा गांधी विद्यालय येथे निराधारांसाठी निवारा कक्षाची सोय करण्यात आलेली असून 24 तास हा कक्ष चालू राहील तसेच काही संस्थांच्या वतीने ही जेवणाची सुविधा करण्यात आलेली आहे यामुळे निराधारांची राहण्याची व जेवणाची दोन्ही सोय झालेली आहे.
Comments
Post a Comment