राज्यभरातील ग्राहकांना दिलासा; वीज दरात मोठी कपात
राज्यभरातील ग्राहकांना दिलासा; वीज दरात मोठी कपात

मुंबई : राज्य सरकारने वीज ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. राज्य वीज नियामक आयोगाने राज्य सरकारच्या तिजोरीवर कोणताही अतिरिक्त भार न पडू देता स्वस्तात वीज देण्याचं नियोजन केलं आहे. वीज नियामक आयोगाचे अध्यक्ष आनंद कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीनुसार, घरगुती विजेच्या वापरात ५-७ टक्के, व्यावसायिक दरात १०-१२ टक्के आणि औद्योगिक दरात १०-११ टक्क्यांनी कपात करण्यात येणार आहे. नवे दर १ एप्रिल २०२० पासूनच लागू होणार असल्यामुळे ग्राहकांना पुढच्या बिलापासूनच दिलासा मिळणार आहे.
वीज नियामक आयोगाच्या माहितीनुसार, मुंबई आणि उर्वरित महाराष्ट्र या प्रमाणे वीज दरात कपात करण्यात आली आहे. मुंबईला वीज पुरवठा करणाऱ्या कंपन्या आयोगाच्या आदेशानुसार दर कमी करतील. तर उर्वरित महाराष्ट्रासाठीचे दर महावितरणकडून कमी केले जातील.
Comments
Post a Comment