केळी व तत्सम फळांना दर मिळण्यासाठी शासनाने लक्ष घालावे
केळी व तत्सम फळांना दर मिळण्यासाठी शासनाने लक्ष घालावे
करमाळा बाजार समिती चे सभापती प्रा.शिवाजीराव बंडगर यांची मागणी
करमाळा प्रतिनिधी : केळी व तत्सम फळ पिकवणाऱ्या शेतकरी वर्गाचे कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमी वर प्रचंड नुकसान होत असून व्यापारी अडवणूक करून अगदी नाममात्र किमतीवर पिके खरेदी करत असल्याने शासनाने यात तात्काळ लक्ष घालावे अशी मागणी करमाळा बाजार समिती चे सभापती प्रा शिवाजीराव बंडगर यानी केली आहे . याबाबत अधिक बोलताना प्रा बंडगर म्हणाले की, तालुक्यातील उजनी जलाशय काठावरील विविध गावात तसेच इतर ही भागातून सध्या केळी चे परिपक्व पीक विक्रीस आले आहे . शेतकरी लोक व्यापार्याना संपर्क करत आहेत .परंतु व्यापारी तीन रूपये किलो दरापेक्षा अधिक दर देत नाहीत.केळी,खरबूज, कलिंगड आदी पिके नाशवंत असल्याने परिपक्व झाला की विकण्याशिवाय पर्याय नसतो . व्यापारी शेतकऱ्याची हिच नस ओळखून असतात. सध्या कोरोनाचे निमित्त सांगून दर पडलेले आहेत असे सांगून शेतकरी फसवले जात आहे .पडलेल्या दराने अशी पिके विकल्यास शेतकऱ्याचा उत्पादन खर्च देखील निघत नसून शेतकरी प्रचंड संकटात सापडला आहे .
तेव्हा शासनाने त्वरीत यावर मार्ग काढून शेतकरी वर्गाला न्याय द्यावा .
.............................................................................................................
कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमी वर केळी,खरबूज, कलिंगड अशी परिपक्व पिके विकल्या शिवाय पर्याय नसलेल्या शेतकरी वर्गाची व्यापार्यानी प्रचंड लूट चालवली आहे .केळी सारखे पिक 3 रू ने खरेदी केले जात असून शेतकर्याचा उत्पादन खर्चही निघत नाही . मागील आठवड्यात पंधरा रूपया पर्यंत दर होता . त्यामुळे शेतकरी उध्वस्त होण्यापूर्वी शासनाने हस्तेक्षेप करावा व शेतकर्याला न्याय ध्यावा .
प्रा शिवाजीराव बंडगर
सभापती,क्रषी उत्पन्न बाजार समिती करमाळा .
............................................................................................................
चौकट - आठवडाभर मी माझी बिटरगाव (वा) हद्दीतील ढोकरी- वांगी रस्त्या लगत च्या क्षेत्रातील केळी विकण्याचा प्रयत्न करतोय . परंतु व्यापारी संगणमताने दर पाडत असून 3 रूपये च्या आतील दराने केळी मागितली गेली . शेवटी काल दि 28 रोजी नाविलाजाने 3 रूपये दराने केळी विकली . कोरोना चे निमित्त करून शेतकरी वाजवला जातोय . माझा उत्पादन खर्च निघत नसून शेती तोट्यात गेली आहे .
लहू रामचंद्र राखुंडे
बिटरगाव (वा ) ता .करमाळा
..............................................................................................................
Comments
Post a Comment