महाराष्ट्रातील करोनाबाधितांचा आकडा २१५ वर

महाराष्ट्रातील करोनाबाधितांचा आकडा २१५ वर


मुंबई: राज्यात करोनाची लागण होण्याचं प्रमाण दिवसागणिक वाढतच असून काल रात्रीपासून आणखी १२ करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यात मुंबई, पुण्यासह पाच शहरांतील रुग्णांचा समावेश आहे. नव्या रुग्णांमुळं राज्यातील करोनाग्रस्तांचा आकडा २१५ वर गेला आहे.
राज्यात काल रात्रीपासून वाढलेल्या रुग्णांमध्ये पुण्यातील पाच, मुंबईतील तीन, नागपूरमधील दोन तसंच, नाशिक व कोल्हापुरातील प्रत्येकी एका व्यक्तीचा समावेश आहे. उपचारानंतर बऱ्या झालेल्या व रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या ३८ झाली आहे. या सर्वांना पुढील १४ दिवस होम क्वारंटाइन राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

सुरुवातीला एका आकड्यात वाढणारे करोनाचे रुग्ण आता दोन आकड्यांत वाढू लागले आहेत. ही राज्यासाठी चिंताजनक बाब मानली जात आहे. करोनाची लागण ही वैयक्तिक संपर्कातून होत असल्यानं राज्य सरकारनं लॉकडाऊनची अंमलबजावणी कठोरपणे सुरू केली आहे. कोणत्याही परिस्थितीत घराबाहेर पडू नका, असं आवाहन मुख्यमंत्र्यांसह सर्व जबाबदार नेतेमंडळी करत आहेत.

करोनाचा तिसरा टप्पा अत्यंत घातक मानला जात आहे. या टप्प्यात करोनाचे रुग्ण गुणाकार पद्धतीनं वाढण्याची शक्यता असल्याचं सांगितलं जातं. मात्र, राज्यानं या टप्प्यात प्रवेश करू नये, यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. त्यासाठी नागरिकांनी पोलीस व सर्व प्रशासकीय यंत्रणांना सहकार्य करावं, अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी केली आहे. शरद पवार यांनीही आज पुन्हा एकदा फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून जनतेला आवाहन केलं आहे. आम्हीही घरात आहोत. तुम्हीही घरातच थांबा, असं त्यांनी म्हटलं आहे.

Comments


Popular posts from this blog

कामाशिवाय घराबाहेर पडू नये

श्रीशा करंजकर हिचे यश

दैनिक 'जनसत्य'च्या बातमीच्या सत्यतेवर शिक्कामोर्तब