Posts

धक्कादायक! सोलापुरात कर्जबाजारी बारचालकाची पत्नी आणि दोन मुलांसह आत्महत्या

Image
धक्कादायक! सोलापुरात कर्जबाजारी बारचालकाची पत्नी आणि दोन मुलांसह आत्महत्या     सोलापूर : कर्जबाजारी झालेल्या एका बारचालकाने आपली पत्नी आणि दोन मुलांसह आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी सायंकाळी आठच्या सुमारास उजेडात आला. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. जुना पुणे चौत्रा नाका परिसरातील हांडे प्लॉटमध्ये राजपूत यांच्या घरात भाड्याने राहणाऱ्या एका बारचालकाने कर्जबाजारीपणाला वैतागून आपल्या पत्नी आणि दोन मुलांसह आत्महत्या केली. करोनाच्या पार्श्वभूमीवर लागलेल्या टाळेबंदीचा मोठा फटका बार व्यवसायाला बसल्यामुळे या आत्महत्याग्रस्त बारचालकाची आर्थिक कुचंबणा झाली होती. त्यातच कर्जाचा वाढलेला डोंगर हलका न होता वाढून असह्य होऊ लागल्यामुळे त्याने पत्नी आणि दोन्ही मुलांसह आत्महत्या करण्याचा टोकाचा निर्णय घेतल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अमोल जगताप (वय ३५) असे बारचालकाचे नाव आहे. त्याची पत्नी मयुरी (वय २८) आणि मुले आदित्य (वय ७) आणि आयुषी (वय साडेचार वर्षे) अशी मृत्यू झालेल्या कुटुंबीयांची नावे आहेत. दरम्यान, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे हे घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी परिस्थि...

सोलापुरात 16 जुलै पासून पूर्ण संचारबंदी

Image
सोलापुरात 16 जुलै पासून पूर्ण संचारबंदी महापालिका गटनेते आणि अधिकाऱ्यांशी चर्चेनंतर जिल्हाधिकारी शंभरकर यांची माहिती                  सोलापूर : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी 16 जुलै ते 26 जुलै या कालावधीत सोलापूर शहर आणि नजिकच्या तालुक्यातील काही गावांत पुर्ण संचारबंदी (लॉकडाऊन) करण्यात येणार असल्याची माहिती आज जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी काल लॉकडाऊन बाबत अधिकाऱ्यांनी एकत्रित बसुन निर्णय घ्यावा त्या बाबतच्या कालावधी, नियमावली ठरवावी अशा सूचना दिल्या होत्या. त्यानुसार आज जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी महापौर श्रीकांचना यन्नम, महापालिकेचे गटनेते आणि प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी ही माहिती दिली.             त्यांनी सांगितले, महापालिका आयुक्त पी.शिवशंकर  यांनी  कालच्या बैठकीत कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शहरात लॉकडाऊन लागू करावा, असे सुचविले होते. त्यानुसार आज या बाबत व्यापक चर्चा झ...

पबजी खेळाच्या वेडापायी एका १९ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या

Image
  पबजी खेळाच्या वेडापायी एका १९ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या नागपूर: पबजी (PUBG) मोबाइल गेमच्या वेडापायी अनेक मुलांनी जीव गमावला आहे. नागपुरातही पबजी गेम खेळण्याच्या वेडातून नैराश्येत गेलेल्या १९ वर्षीय तरुणानं पंख्याला बांधलेल्या दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना जुना फुटाळ्यातील कॉर्पोरेशन कॉलनी येथे बुधवारी घडली. ऋतिक किशोर ढेंगे असे मृताचे नाव आहे. तो पुण्यातील एका महाविद्यालयामध्ये हॉटेल मॅनेजमेंटच्या अभ्यासक्रमाला होता.करोनामुळे ऋतिक नागपुरात परतला. तो खोलीत तासनतास मोबाइलवर पबजी खेळायचा. त्यामुळे त्याची प्रकृती खालावली होती. नातेवाइकांनी त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. उपचारानंतर तो घरी परतला. मात्र, त्यानंतरही तो पब्जी खेळण्यात गुंग राहायचा. याचदरम्यान तो नैराश्येत गेला. तणावात राहायला लागला. त्याच्यातील बदल कुटुंबीयांनाही जाणवला. ऋतिक याच्या वडिलांनी त्याला अनेकदा समजावले. परंतु त्याचे पब्जीचे वेड गेले नाही. बुधवारी त्याने कुटुंबीयांसोबत जेवण केले. त्यानंतर तो खोलीत गेला. मोबाइलवर पब्जी खेळला. याचदरम्यान त्याने पंख्याला दोरी बांधून...

कोरोना झालेल्या व्यक्तीलाच लुटलं, रुग्णालयातून शिफ्ट करण्यासाठी घेतले तब्बल....!

Image
कोरोना झालेल्या व्यक्तीलाच लुटलं, रुग्णालयातून शिफ्ट करण्यासाठी घेतले तब्बल....! पुणे : कोरोना बाधित रुग्णाला एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात नेण्यासाठी पुण्यातील एका रुग्णवाहिकेने रुग्णाकडून तब्बल आठ हजार रुपये उकळल्याचा प्रकार समोर आला आहे. प्रकार उघडकीस आल्यानंतर संबंधित रुग्णवाहिकेच्या कंपनीवर बिबेवाडी पोलीस स्टेशनमध्ये फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोटार वाहन निरीक्षक धनंजय गोसावी (वय 41) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी अधिक माहिती अशी की, पुण्यातील एका कोरोनाबाधित रुग्णाला एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात शिफ्ट करायचे होते. त्याकरिता नातेवाईकांनी संजीवनी सर्विसेस या कंपनीची रुग्णवाहिका मागवली होती. या रुग्णवाहिकेने सात किलोमीटर अंतरासाठी 900 रुपये घेणे अपेक्षित होते. परंतु यांनी मात्र संबंधित व्यक्तीकडून तब्बल नऊ हजार रुपये उकळले. याबाबत नातेवाईकांनी जिल्हा प्रशासनाकडे तक्रार केली होती.या रुग्णवाहिकेची चौकशी करत असताना आरटीओकडे या गाडीची नोंदणी मोबाईल क्लीनिक व्हॅन अशी होती. परंतु प्रत्यक्षात तिचा वापर रुग्णवाहिका म्हणून केला जात होता. सर्व प्र...

धक्कादायक! परळीतील अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन पुण्यात बलात्कार

Image
धक्कादायक! परळीतील अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन पुण्यात बलात्कार बीड :  अल्पवयीन मुलीला लग्नाचं आमिष दाखवून तिचं अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पीडित मुलगी परळी शहरात रहिवासी आहे. पीडित मुलगी 16 वर्षांची असून नराधमानं तिला परळी येथून पळवून नेलं. परभणी आणि पुणे शहरातील वेगवेगल्या ठिकाणी नेऊन तिच्यावर वारंवार बलात्कार केल्याची माहिती समोर आली आहे. पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी नासिर पाशा पठाण याच्यासह त्याची पत्नी आरशा नासिर पठाण हिला महिलेला ताब्यात घेतलं आहे.  या प्रकरणी परळी शहरातील संभाजी नगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. काय आहे प्रकरण? आरोपी नासिर पाशा पठाण यानं पीडित मुलाला तिच्या राहत्या घरातून लग्नाचं आमिष दाखवून पळवून नेलं होतं. नंतर तिला परभणी, पुणे येथे नेऊन वेगवेगळ्या ठिकाणी तिच्यावर वारंवार बलात्कार केला. पीडितेच्या नातेवाईकांनी मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार संभाजीनगर पोलिस स्टेशनमध्ये नोंदवली होती. पीडित मुलगी परभणीत असल्याचं पोलिस तपासात समोर आलं. पोलिसांनी तिथं जाऊन चौकशी केली असता धक्कादायक प्र...

हातात पिस्तूल घेत फिल्मी अंदाजात डायलॉगबाजी करणं तरुणाला पडलं महागात

Image
हातात पिस्तूल घेत फिल्मी अंदाजात डायलॉगबाजी करणं तरुणाला पडलं महागात धुळे : हातात पिस्तूल घेऊन फिल्मी अंदाजात टिक टॉकवर डायलॉगबाजी करणं एका तरुणाला चांगलंच महागात पडलं आहे. विशेष म्हणजे मित्राच्या आगाऊपणाची दोन तरुणांना देखील चांगलीच अद्दल घडली आहे.धुळे शहरातील भीमनगर परिसरात राहणाऱ्या दीपक शिरसाट याने टिक टॉकवर गावठी कट्टा हातात घेत एक व्हिडिओ तयार केला होता. सोशल मीडियावर व्हायरल झालेला तो व्हिडिओ पोलिस अधिक्षक चिन्मय पंडीत यांच्या हाती लागला होता. त्यानंतर त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक शिवाजी बुधवंत यांना कारवाईचे आदेश दिलेत. यावेळी धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने त्याला लागलीच अटक केली आहे. विशेष म्हणजे आरोपीला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने आपल्या अन्य 2 साथीदार मित्र पंकज परशराम जिसेजा व अभय दिलीप अमृतसागर याचे नाव सांगितले. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेत अभयकडून पुन्हा एक गावठी पिस्तूल व दोन जिवंत काडतुसं जप्त केली आहेत.

बार्शी शहरात ६४ करोना पॉझिटिव्ह तर पंचेविस कंटेंटमेन्ट झोन

Image
बार्शी शहरात ६४ करोना पॉझिटिव्ह तर पंचेविस कंटेंटमेन्ट झोन सात कंटेंटमेन्ट झोन रद्द    बार्शी :  बार्शी  शहरात जवळपास ६४  करोना पॉझिटिव्ह असून आज शहरातील विविध भागात तब्बल पंचेविस कंटेंटमेन्ट झोन आहेत  आज गुरुवारी रात्री बार्शी तालुक्यातील एकूण१२ करोना  अहवाल  प्राप्त  झाले आहेत यामध्ये शहरातील सात अहवाल आहेत त्यापैकी चार निगेटिव्ह आहेत तर सुभाष नगर,भवानी पेठ,तानाजी चौक, असे तीन अहवाल करोना पॉझिटिव्ह आहेत तसेच वैराग चे दोन, सासुरे एक,घाणेगाव एक असे चार अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत तर नागोबाची वाडी येथील एक अहवाल निगेटिव्ह आला आहे तसेच आज गुरुवारी बार्शी शहरातील २९ ,वैराग १ , साकत तीन ,मांडेगाव एक आणि भूम तालुक्यातील वांगी येथील एक असे एकूण ३५ स्वब तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत तर एकूण २१० अहवाल प्रलंबित आहेत अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ संतोष जोगदंड यांनी दिली आहे.अधिक माहिती अशी की शहरातील विविध भागात ३१ कंटेंटमेन्ट झोन करण्यात आले होते त्यापैकी वाणी प्लॉट, वायकुळे प्लॉट, बगळे बरड, गुंड प्लॉट, आर एस एम हाईट्स,हांडे गल्ली,कृष्णा कॉलनी...

दैनिक 'जनसत्य'च्या बातमीच्या सत्यतेवर शिक्कामोर्तब

Image
दैनिक 'जनसत्य' च्या बातमीच्या सत्यतेवर शिक्कामोर्तब शिवसेनेच्या आंदोलनाला यश जगदाळे मामा हॉस्पिटलमध्ये करोनावर उपचार मोफतच  दोन दिवसांपूर्वी मोफत उपचार नाही म्हणून सांगणाऱ्या डॉ यादव यांचा यूटर्न बार्शी  (प्रतिनिधी) शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर यांच्या आंदोलनानंतर खडबडून जागे झालेल्या जगदाळे मामा हॉस्पिटलचे  सर्वेसर्वा डॉ यादव यांनी आजपासूनच  कोविड रुग्णांवर मोफत उपचार केले जातील अशी घोषणा करत महात्मा फुले आरोग्य योजनेच्या कार्यालयाचे उद्घाटन आंधळकर यांचेहस्ते केले यावेळी शिवसेना शहर प्रमुख दीपक आंधळकर, राजेंद्र गायकवाड, समीर सैय्यद, बापू तेलंग,एलियास शेख,शाहिद पठाण, ईश्वर  साखरे,मॅक्स शिंदे, समीर सैय्यद, युवराज वाघमारे, इब्राहिम काझी, मोहसीन सैय्यद, सोनू नवगण,अन्वर मुजावर, सोमा थंब,सोमनाथ कांबळे, अतुल इटकर, जावेद पठाण,कलूशेख,रमेश चौधरी, हबीब सैय्यद, महेश साखरे,आदी सह शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. अधिक माहिती अशी की जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार शासनाच्या महात्मा फुले जण आरोग्य योजनेतून कोविड रुग्णांवर मोफत उपचार करण्यासाठी जगदाळे मामा हॉस्पिटल सम...

इंधन समायोजन धरून वीज दरवाढ नाही : महावितरण

Image
इंधन समायोजन धरून वीज दरवाढ नाही : महावितरण मुंबई : महावितरणच्या घरगुती वर्गवारीतील वीजदरामध्ये इंधन समायोजन आकार धरून सरासरी  दरवाढ झालेली नाही, असे स्पष्टीकरण महावितरणकडून करण्यात आले आहे.मा. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने दि. ३० मार्चला चौथ्या नियंत्रण कालावधीसाठी संपूर्ण नियामक प्रक्रियेचा अवलंब करून बहुवर्षीय वीजदर आदेश (२०१९ चे प्रकरण क्र. ३२२) जारी केला आहे. यामध्ये आर्थिक वर्ष २०२०-२१ ते आर्थिक वर्ष २०२४-२५ साठी वीजदर निश्चित केले आहेत. सदर वीजदर आदेश दि. १ एप्रिल २०२० पासून लागू आहे. सदर आदेशानुसार घरगुती वर्गवारीतील ग्राहकांसाठीच्या सरासरी वीजदरात सुमारे ५ टक्क्यांची घट केलेली आहे. त्यामुळे, वीजदरांमध्ये ५० पैसे ते १ रुपया इतकी वाढ झाली असे म्हणणें संयुक्तिक नाही. वीजखरेदी खर्चामधील सध्या लागू असलेल्या वीजदर विनियमातील तरतुदीनुसार आयोगाने मान्य केलेल्या वीज खरेदीच्या खर्चापेक्षा जास्त खर्च झाल्यास त्याच्या वसुलीसाठी इंधन समायोजन आकार आकारण्यात येतो. त्यामुळे इंधन समायोजन आकार हा वीजदराचा अविभाज्य भाग आहे आणि म्हणूनच ग्राहकांच्या वीजदरांची तुलना करताना इंधन समायोजन आकार...

सांगलीत वकिलाविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल, पोलिसांनी केली अटक

Image
सांगलीत वकिलाविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल, पोलिसांनी केली अटक सांगलीः सांगलीतील एका नामांकित वकिलाविरोधात रविवारी विश्रामबाग पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला. कविराज अनिल पाटील-सावर्डेकर असे गुन्हा दाखल झालेल्या वकिलाचे नाव आहे. विश्रामबाग परिसरातील एका मोठ्या शैक्षणिक संस्थेत कायदा सल्लागार असल्याचे भासवून त्याने २८ वर्षीय महिलेसोबत तिच्या इच्छेविरोधात शारीरिक संबंध ठेऊन बलात्कार केल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी कविराज पाटील याला अटक केली आहे.कविराज पाटील हा शहरातील एका राजकीय पक्षाच्या नेत्याशी संबंधित आहे. विश्रामबाग परिसरातील एका मोठ्या शैक्षणिक संस्थेमध्ये तो कायदेशीर सल्लागार असल्याचे सर्वांना सांगत असे. यातूनच त्याने एका महिलेसोबत गेल्या काही महिन्यांपासून ओळख वाढवली होती. या ओळखीतूनच त्याने या महिलेशी जवळीक साधली. ओळखीचा गैरफायदा घेऊन त्याने जानेवारी महिन्यापासून सातत्याने त्या महिलेशी शारीरिक संबंध ठेवले. पीडित महिलेने कविराज याच्याकडे लग्नाचा आग्रह धरला. मात्र, त्याने लग्नास नकार दिल्याने पीडित महिलेने विश्रामबाग पोलिस ठाण्यात धाव घे...

खळबळजनक! जेवण दिलं नाही, मुलानं गोळ्या घालून केली आईची हत्या

Image
खळबळजनक! जेवण दिलं नाही, मुलानं गोळ्या घालून केली आईची हत्या नवी दिल्ली: जेवण दिलं नाही म्हणून मद्यधुंद तरुणाने आपल्या आईची गोळ्या घालून हत्या केल्याची धक्कादायक घटना दिल्लीत घडली आहे. दारू पिऊन घरी आल्यानं आई नाराज होती. त्यामुळं तिनं जेवण देण्यास नकार दिला. यावरून रागाच्या भरात तरुणानं आईवर गोळ्या झाडल्या आणि तिची हत्या केली.आईवर गोळ्या झाडून तिची हत्या करणाऱ्या मद्यधुंद तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. बवानामध्ये ही धक्कादायक घटना घडली. सूरज (२६) असं या तरुणाचे नाव आहे. सूरज रोज रात्री दारू पिऊन घरी येत असे. यावरून आई बाला देवी (वय ६०) ही त्याच्यावर नाराज होत असे. त्यानंतर आईशी तो वाद घालत होता. गुरुवारी रात्री तो घरी आला. दारुच्या नशेत होता. त्याने आईकडे जेवण मागितलं. त्यावर आईनं त्याला जेवण दिलं नाही. तो रागात खोलीत गेला आणि गावठी पिस्तुल तो घेऊन आला आणि आईवर गोळ्या झाडल्या. यात तिचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांच्या माहितीनुसार, बाला देवी या कुटुंबासह बवाना गावात राहत होत्या. कुटुंबात दोन मुली आणि तीन मुलं आहेत. बाला यांच्या पतीचं निधन झालं आहे. दोन मोठी मुलं पेंटर असून, सूरज वाहनचाल...

MBBS विद्यार्थ्यानं तरुणीवर केला बलात्कार

Image
 MBBS विद्यार्थ्यानं तरुणीवर केला बलात्कार सांगली: सांगलीतील एका प्रतिष्ठित कॉलेजमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या तरुणाने लग्नाच्या भूलथापा देऊन एका तरुणीवर बलात्कार केल्याची घटना काल रात्री उशिरा उघडकीस आली. अनेकदा शारीरिक संबंध प्रस्थापित केल्यानंतर तिला अपत्य झालं. त्यानंतर तरुणानं लग्नास नकार दिला. पीडित तरुणीने त्याच्याविरोधात बलात्काराची तक्रार दिली आहे. पृथ्वीराज पाटील (रा. निंबवडे, ता. आटपाडी) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. विश्रामबाग पोलिसांनी पाटील याला रविवारी रात्री उशिरा अटक केली.विश्रामबाग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आटपाडी तालुक्यातील निंबवडे येथील पृथ्वीराज पाटील हा सांगलीतील एका प्रतिष्ठित वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसचे शिक्षण घेत आहे. याच महाविद्यालयातील नर्सिंग विभागात पीडित तरुणी शिकते. तरुणीशी ओळख वाढविल्यानंतर पृथ्वीराज याने त्या तरुणीशी जवळीक साधली. कालांतराने या दोघांमधील मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून पृथ्वीराज पाटील याने विश्रामबाग परिसरात तरुणीशी वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्या तरुणीला अपत्यही झाले. ...

जादुटोण्याची धमकी देऊन पैसे उकळले

Image
जादुटोण्याची धमकी देऊन पैसे उकळले पुणे: जादुटोणा करून कुटुंब उध्वस्त करण्याची धमकी देऊन सोमवार पेठेतील एका महिलेकडून १५ हजार रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात जादुटोणा विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका ३८ वर्षीय महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार सुनिता पवनळे उर्फ सोनी व इतर दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्ररादार यांच्या मुलाने सोन्याचे दागिने त्याच्या मित्रांना दिले आहेत. ते दागिने परत मिळत नव्हते. या दरम्यान तक्रारदार यांची काही ओळखीच्या व्यक्तींमार्फत आरोपींशी ओळख झाली. आरोपींनी तक्रारदार यांना देवीची पूजा करून प्रसन्न केल्यानंतर दागिने परत मिळतील, असे सांगितले. त्यानंतर आरोपींनी महिलेला धमकावण्यास सुरुवात केली. जादुटोणा करून महिलेचे कुटुंब उध्वस्त करण्याची धमकी देऊन त्यांच्याकडून वेळोवेळी १५ हजार रूपये घेतले. या त्रासाला कंटाळून महिलेने समर्थ पोलिसांकडे तक्रार दिली. या प्रकरणी समर्थ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

धक्कादायक! करोना झाल्याचा संशय; तरुणीला धावत्या बसमधून फेकले

Image
धक्कादायक! करोना झाल्याचा संशय; तरुणीला धावत्या बसमधून फेकले नवी दिल्ली: करोनानं देशभरात हाहाकार माजवला आहे. करोनाबाधित आणि मृत्यूचा आकडा दिवसागणिक वाढत आहे. करोनाचा लोकांनी धसका घेतला आहे. त्याच भीतीतून एका तरुणीला प्राण गमवावे लागले आहेत. करोनाबाधित असल्याच्या संशयातून बसचालक आणि कंडक्टरनं तरुणीला धावत्या बसमधून फेकून दिल्याची घटना नुकतीच घडली. यात गंभीर जखमी झाल्याने तिचा मृत्यू झाला.दिल्लीच्या मंडालवी परिसरात तरुणी राहत होती. करोनाबाधित असल्याच्या संशयातून बसचालक आणि कंडक्टरनं तिला मथुरा टोलनाक्याजवळ धावत्या बसमधून तिला फेकून दिले. 'मुलीची कोविड १९ चाचणी करण्यात आली होती. तिला दिल्लीतून पाठवण्यात आले होते. तिचा अहवाल निगेटिव्ह आला होता. मुलीला अशक्तपणा आला होता. त्यामुळं तिला चक्कर आली. ती नीट चालू शकत नव्हती. मात्र, ती करोनाबाधित असल्याचा संशय आल्यानं बसचालक आणि कंडक्टरनं तिला धावत्या बसमधून फेकले,' असा आरोप कुटुंबीयांनी केला. मुलीला धावत्या बसमधून फेकले त्यावेळी तिच्या आईनं तिला वर ओढण्याचे प्रयत्न केले. मात्र, तिला वाचवू शकली नाही. मुलगी खाली पडली. तिच्या डोक्याला गंभीर...

ठरलं! ८ जुलैपासून महाराष्ट्रात राहण्याची व्यवस्था असलेली हॉटेल्स उघडणार

Image
ठरलं! ८ जुलैपासून महाराष्ट्रात राहण्याची व्यवस्था असलेली हॉटेल्स उघडणार अखेर राज्यातील राहण्याची व्यवस्था असलेल्या हॉटेल्सबाबत सकारात्मक निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. गेल्या १०० दिवसांपेक्षा जास्त काळ बंद असलेली ही हॉटेल्स ८ जुलैपासून उघडणार आहेत. राहण्याची व्यवस्था असलेली हॉटेल्स उघडण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मिशन बिगीन अगेन अंतर्गत हा निर्णय घेण्यात आला आहे. राहण्याची क्षमता असलेल्या हॉटेल्समध्ये ३३ टक्के ग्राहकांना राहण्याची संमती राज्य सरकारने दिली आहे. हे आहेत नियम हॉटेलची जी क्षमता आहे त्याच्या ३३ टक्के पाहुण्यांना संमती दिली जाऊ शकते. रेस्तराँमध्येही फक्त राहण्यासाठी संमती देण्यात आलेली आहे ज्यावेळी ग्राहक येतील तेव्हा थर्मोमीटरने तापमान पाहणं गरजेचं आहे रिसेप्शन टेबलवर स्क्रिनिंग करणं सक्तीचं असणार आहे सॅनेटायझरचा वापर हा सक्तीसाठी करण्यात आला आहे हॉटेल्स आणि रेस्तराँमध्ये असलेले गेमिंग झोन, स्विमिंग पूल, जिम हे बंदच राहणार आहेत जे ग्राहक हॉटेल्समध्ये राहण्यासाठी येतील त्यांना मास्क वापरणं अनिवार्य असणार आहे. हॉटेल्समध्ये गर्दी न होऊ देण्याची जबाबदारी ही हॉटेल...

घृणास्पद! 2 तृतीयपंथियांनी केली तरुणाशी मैत्री, ड्रग्ज देऊन रात्री प्रायव्हेट पार्ट कापले आणि...

Image
घृणास्पद! 2 तृतीयपंथियांनी केली तरुणाशी मैत्री, ड्रग्ज देऊन रात्री प्रायव्हेट पार्ट कापले आणि... घरात कोणतेही शुभ कार्य असो अशा वेळी आजही काही शहरांमध्ये तृतीयपंथियांना बोलवले जाते, किंवा त्यांचे म्हणणे शुभ मानले जाते. मात्र गुरदासपूरमध्ये तृतीयपंथांनी एक घृणास्पद काम केले. येथील दोन तृतीयपंथियांनी एका युवकाशी मैत्री केली, ड्रग्ज दिले आणि त्याचे प्रायव्हेट पार्ट कापले. या घटनेची माहिती युवकाच्या कुटुंबीयांना समजताच त्यांनी दोघांविरुद्ध तक्रार दाखल केली. सध्या पोलीस या दोन्ही तृतीयपंथियांचा शोध घेत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरूण गुरदासपूरमध्ये काम करतो. पीडित तरुण भजन, किर्तन करत असे. त्याचवेळी त्याची या दोन तृतीयपंथियांची ओळख झाली. यातील एकाचे नाव सोनिया असून तिनं या युवकाशी मैत्री केली. त्यानंतर सोनिया या युवकाला तिच्या घरी घेऊन जाऊ लागली. यावेळी सोनियानं तरूणाची ओळख तिचा मित्र असलेल्या गुरु परवीन या तृतीयपंथियांची ओळख करून दिली. दरम्यान पीडित तरुणाने असा आरोप केला आहे की, जेव्हा जेव्हा तो सोनिया त्याला घरी घेऊन जायची तेव्हा त्याला मारायची. हे काही दिवस चालूच राहिले. त्यानंत...

नराधम काकानं तोडले पुतणीच्या अब्रूचे लचके! पीडिता अंघोळ करत असतानाच घुसला होता घरात

Image
नराधम काकानं तोडले पुतणीच्या अब्रूचे लचके! पीडिता अंघोळ करत असतानाच घुसला होता घरात भोपाळ :  15 वर्षीय विद्यार्थिनीवर बलात्काराच्या घटनेने मध्यप्रदेशची राजधानी भोपाळ शहर हादरलं आहे. रातीबड परिसरात एका ओळखीतील व्यक्तीनं घरात घुसून अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. आरोपी ओळखीतला असून पीडित मुलगी त्याला काका असं संबोधत होती. पीडिता बाथरुममध्ये अंघोळ करत असतानाच नराधम घरात घुसला होता. बहिणीची आरोळी हाक ऐकून पीडितेचा भाऊ मदतीसाठी धावून आला. तितक्यात आरोपीने तेथून पळ काढला. या प्रकरणी रातीबड पोलिसांत आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.रातीबड पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पीडित मुलगी आई-वडील आणि दोन भावासोबत राहते. तिने पोलिसांना दिलेला जबाबात सांगितलं की, शनिवारी दुपारी 11 वाजता ती घरात एकटी होती. आई-वडील आणि भाऊ बाहेर गेले होते. पीडिता बाथरुममध्ये अंघोळ करत असताना आरोपी घरात घुसला. घरात कोणी नाही याचा फायदा घेत तो बाथरुमपर्यंत पोहोचला. त्यानं मुलीवर अत्याचार केला. पीडितेची आरोळी ऐकून तिचा भाऊ धावत आता. तोपर्यंत आरोपी पसार झाला होता. पोलिसांनी पीडित मुलीच्या तक्रारीवरून आरोपी सुदामा...

सख्खा भाऊ निघाला वैरी! जमिनीच्या तुकड्यासाठी भावानं केला भावावर कुऱ्हाडीनं वार

Image
सख्खा भाऊ निघाला वैरी! जमिनीच्या तुकड्यासाठी भावानं केला भावावर कुऱ्हाडीनं वार कल्याण  : शेतीच्या वादातून सख्ख्या भावाने आपल्या मुलांच्या मदतीने भाऊ आणि काकांच्या अंगावर चारचाकी वाहन चढवत त्यांच्यावर कुऱ्हाडीनं हल्ला केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कल्याण जवळील मलंगगडाच्या पायथ्याशी असलेल्या खरड गावातील घटना समोर आली आहे. वसंत म्हात्रे आणि त्यांचा मुलगा नितीन म्हात्रे या दोघांनी वंडार म्हात्रे यांच्या अंगावर चारचाकी वाहन चढवलं. यात वंडार म्हात्रे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. खरड गावात एका सख्ख्या भावानं दुसऱ्या भावाचं भावावर कुऱ्हाडीने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत वंडार म्हात्रे हे गंभीर जखमी झाले आहेत. वडील कुऱ्हाडीने मारत असताना मुलाने देखील काकांच्या अंगावर चारचाकी वाहन टाकल्याने त्यांच्या पायाला, हाताला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. ग्रामीण भागात जमिनींना सोन्याचे भाव आले आहेत. त्यामुळे जमिनीची विक्री केल्यानंतर त्यांचे हिस्से करत असताना मोठे गुन्हे सुद्धा झाले आहेत. लॉकडाऊनच्या काळात ग्रामीण भाग...

‘वडिलांनीच साडीने घोटला आईचा गळा’, 10 वर्षाच्या मुलीने सांगितलं ‘त्या’ रात्री काय झालं

Image
‘वडिलांनीच साडीने घोटला आईचा गळा’, 10 वर्षाच्या मुलीने सांगितलं ‘त्या’ रात्री काय झालं इंदूर :  नवरा बायकोची भांडणं ही तशी नवी नाहीत. संसारात अशी भांडणं होत असतात. मात्र याच भांडणांनी एका महिलेला आपला जीव गमवावा लागला. तु घर चालविण्यासाठी पैसे का आणत नाही असा तगादा नवरा लावत होता. त्यातून त्यांची भांडणं होत होती. अशाच एका भांडणानंतर नवऱ्याने बायकोची साडीने गळा घोटून हत्या केली. (Husband Killed wife) रात्री घडलेला हा सगळा प्रकार त्यांच्या 10 वर्षांच्या मुलीने (10 Years daughter) पाहिला. घाबरलेल्या मुलीने पोलिसांना (Police) जेव्हा ही घटना सांगितली तेव्हा त्यांनाही धक्का बसला. पत्नीवर अंत्यसंस्कार करून परत येत असतानाच पोलिसांनी त्या नराधमाला अटक केली. मध्यप्रदेशातल्या इंदूरमधल्या ममता नगरमध्ये रिना आणि मनिष हे जोडपं राहतं. त्यांना 10 वर्षांची प्राची ही मुलगी आहे. मनिष हा नोकरी करतो. मात्र आपला सगळा पैसा दारूमध्ये वाया घालतो. त्यातून नवरा बायकोची कायम भांडणं होत असे. सगळे पैसे दारुत जात असल्याने मनिष हा बायकोला कमाई करून पैसे आणण्यास सांगत होता. वडिल हे कायम आईला मारत असायचे. तुम्ही दा...

पोलीस नाईक धनाजी सराटे याला ३० हजारांची लाच घेताना अटक

Image
पोलीस नाईक धनाजी सराटे याला ३० हजारांची लाच घेताना अटक भाऊबंदकीतला वाद मिटवण्यासाठी मागितली लाच संग्रहित छायाचित्र कोल्हापूर पोलीस ठाण्याच्या आवारात ३० हजार रुपयाची लाच स्वीकारताना एका पोलीस नाईकाला शनिवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. त्याला अटक करण्यात आली आहे. शाहुवाडी पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक धनाजी हरी सराटे (वय ४५, मूळ रा. देवाळे, ता. पन्हाळा, सध्या रा. चनवाड रोड, शाहुवाडी) असे या पोलिसाचे नाव आहे. भाऊबंदकी च्या वादातून निर्माण झालेला वाद मिटवण्यासाठी लाचेची मागणी करण्यात आली होती.तक्रारदारच्या साडूचे त्यांच्या भाऊबंधाशी भांडण झाले होते. याप्रकरणी शाहुवाडी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. या गुह्याचा तपास पोलीस नाईक धनाजी सराटे करीत आहेत. या गुह्याच्या तपासकामात मदत करण्यासाठी सराटे याने त्याच्याकडे ३० हजार रुपयांची मागणी केली. या मागणीबाबत कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करण्यात आली. या दाखल तक्रारीची लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पोलीस अधिकाऱयांनी पडताळणी केली. या पडताळणीमध्ये सराटेने लाच मागितल्याचे समोर आले. त्यावरुन शुक्रवारी दुपारी सापळा लावण्यात आला...

“१५ ऑगस्टपर्यंत करोनावर लस? शक्यच नाही”

Image
“१५ ऑगस्टपर्यंत करोनावर लस? शक्यच नाही” ICMRच्या दाव्यावर तज्ज्ञांकडून प्रश्नचिन्ह संग्रहित छायाचित्र करोनाच्या संकटामुळे चिंतेत असलेल्या देशवासीयांना गुरूवारी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं (ICMR) दिलासादायक बातमी दिली. भारत बायोटेक आणि आयसीएम यांनी करोनावर प्रभावी ठरू शकणारी कोव्हॅक्सीन ही लस शोधली आहे. ही लस १५ ऑगस्टपर्यंत बाजारात आणणार असल्याचा विश्वास आयसीएमआरनं व्यक्त केला. मात्र, आयसीएमआरनं केलेला दावा अवास्तविक असल्याचं आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांचं म्हणणं आहे. १५ ऑगस्टपर्यंत कोव्हॅक्सीन बाजारात आणण हे शक्य नाही, असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. यासंदर्भात ‘इंडियन एक्स्प्रेस’नं वृत्त दिलं आहे. सध्या देशात करोना रुग्णांच्या आकडेवारीत दररोज उच्चांकी संख्येनं भर पडत आहे. दुसरीकडे अजूनही करोनावर पूर्णपणे प्रभावी ठरणारे औषध वा लस तयार करण्यात आलेली नाही. भारत बायोटेक व भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं कोव्हॅक्सीन ही लस तयार केली असून, त्याच्या रुग्णांवरील चाचण्या अजून बाकी आहेत. मात्र, ही लस औषध १५ ऑगस्टपर्यंत लोकांसाठी उपलब्ध करू देऊ, असं आयसीएमआरनं एका पत्रातून म्हटलं होतं. आयसीएमआरनं क...

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त संदीप बिष्णोईंच्या बदलीची जोरदार चर्चा !

Image
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त संदीप बिष्णोईंच्या बदलीची जोरदार चर्चा ! शहरातील अवैध धंद्यांबद्दल राष्ट्रवादी आमदारांचं मुख्यमंत्री-उप मुख्यमंत्र्यांना निवेदन पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांची उचलबांगडी होणार असल्याची पोलीस दलात जोरदार चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शहरात सुरू असलेल्या अवैद्य धंद्यांविषयी निवेदन दिले होते. यानंतर शहरात बिष्णोईंच्या बदलीची चर्चा सुरु झाली आहे. सप्टेंबर २०१९ रोजी पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचा पदभार स्वीकारला होता. त्यानंतर गुन्हेगारी आटोक्यात येईल अस वाटलं होतं. परंतु, तसे काही झाल्याचे निदर्शनास आले नाही. शहरात वाहन तोडफोड, खून, दरोडा, एटीएम फोडणाऱ्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला होता. मध्यंतरी टोळी वर्चस्वातून एका चा खून झाल्याची घटना देखील घडली होती. दरम्यान, मे महिन्यात ११ खुनाच्या घटनांनी शहराच्या कायदा सुव्यवस्थेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. कोरोना च्या संकटात पोलीस आयुक्तांचे कौतुक...

जुलैमध्ये होणा-या NEET, JEE Main 2020 परीक्षा दोन महिन्यांनी पुढे ढकलल्या

Image
जुलैमध्ये होणा-या NEET, JEE Main 2020 परीक्षा दोन महिन्यांनी पुढे ढकलल्या सप्टेंबरमध्ये होणार परीक्षा, केंद्रीय मनुष्यबळ मंत्र्यांनी केली घोषणा (संग्रहित छायाचित्र) NEET व JEE Main परीक्षांना पुन्हा एकदा करोना संकटाचा फटका बसला आहे. केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयानं जुलै महिन्यात या परीक्षा घेण्याचा कार्यक्रम घोषित केला होता. मात्र, देशातील परिस्थितीत अजूनही सुधारणा होत नसल्यानं, त्याचबरोबर वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमी परीक्षा दोन महिन्यांनी पुढे ढकलण्याचा निर्णय केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयानं घेतला आहे. ऐन परीक्षांच्या काळात करोनानं देशात शिरकाव केला. त्यामुळे शालेय परीक्षांपासून सर्व अभ्यासक्रमांच्या परीक्षांवर परिणाम झाला आहे. करोनामुळे यंदा जेईई व नीट या दोन्ही परीक्षाही लांबल्या आहेत. मे महिन्यामध्ये केंद्रीय मनुष्यबळ मंत्री रमेश पोखरियाल यांनी जुलैमध्ये दोन्ही परीक्षा घेण्याचा कार्यक्रम जाहीर केला होता. त्यासंदर्भातील वेळापत्रकही निश्चित करण्यात आलं होतं. मात्र, अजूनही परिस्थिती चिंताजनक असल्यानं दोन्ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय मनुष्यबळ मंत्री पोख...

धोक्याची घंटा : दिल्ली-एनसीआरला पुन्हा भूकंपाचा धक्का

Image
धोक्याची घंटा : दिल्ली-एनसीआरला पुन्हा भूकंपाचा धक्का नवी दिल्ली : दिल्ली, उत्तर प्रदेश, हरियाणा आणि राजस्थान या भागांना शुक्रवारी सायंकाळी ७.०० वाजल्याच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. 'नॅशनल सेंटर फॉर सीस्मोलॉजी'च्या रिपोर्टनुसार, गुरुग्राम-हरियाणाच्या दक्षिण-पश्चिम भागात ६३ किलोमीटरच्या अंतरावर या भूकंपाची तीव्रता ४.५ रिश्टर स्केल मोजण्यात आली. तर राजस्थानात मात्र या भूकंपाची तीव्रता ४.७ रिश्टर स्केल मोजण्यात आली. दरम्यान, या भूकंपामुळे अद्याप कोणत्याही जीवितहानी किंवा वित्तहानीची माहिती समोर आलेली नाही. उल्लेखनीय म्हणजे, गेल्या काही दिवसांपासून दिल्ली - एनसीआरसहीत देशातील उत्तर भागात अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के जाणवत आहेत.दिल्ली - एनसीआर या भागांसहीत हरियाणा आणि राजस्थानच्या काही भागांनाही हा भूकंपाचा धक्का जाणवला. भीतीमुळे घाबरलेले अनेक लोक जीव वाचवण्यासाठी घरातून बाहेर पडले. भूकंपाच्या धक्क्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सोशल मीडियावर लोकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं. 'काही वेळापूर्वी दिल्लीत भूकंपाचे धक्के जाणवले. तुम्ही सर्व सुरक्षित असाल अशी आश...