सांगलीत वकिलाविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल, पोलिसांनी केली अटक


सांगलीत वकिलाविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल, पोलिसांनी केली अटक

Opinion: Why New Zealand needs to ramp up its Serious Fraud Office ...
सांगलीः सांगलीतील एका नामांकित वकिलाविरोधात रविवारी विश्रामबाग पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला. कविराज अनिल पाटील-सावर्डेकर असे गुन्हा दाखल झालेल्या वकिलाचे नाव आहे. विश्रामबाग परिसरातील एका मोठ्या शैक्षणिक संस्थेत कायदा सल्लागार असल्याचे भासवून त्याने २८ वर्षीय महिलेसोबत तिच्या इच्छेविरोधात शारीरिक संबंध ठेऊन बलात्कार केल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी कविराज पाटील याला अटक केली आहे.कविराज पाटील हा शहरातील एका राजकीय पक्षाच्या नेत्याशी संबंधित आहे. विश्रामबाग परिसरातील एका मोठ्या शैक्षणिक संस्थेमध्ये तो कायदेशीर सल्लागार असल्याचे सर्वांना सांगत असे. यातूनच त्याने एका महिलेसोबत गेल्या काही महिन्यांपासून ओळख वाढवली होती. या ओळखीतूनच त्याने या महिलेशी जवळीक साधली. ओळखीचा गैरफायदा घेऊन त्याने जानेवारी महिन्यापासून सातत्याने त्या महिलेशी शारीरिक संबंध ठेवले. पीडित महिलेने कविराज याच्याकडे लग्नाचा आग्रह धरला. मात्र, त्याने लग्नास नकार दिल्याने पीडित महिलेने विश्रामबाग पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी त्या महिलेच्या फिर्यादीवरून कविराज पाटील याच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करून त्याला तातडीने अटक केली.

Comments


Popular posts from this blog

कामाशिवाय घराबाहेर पडू नये

श्रीशा करंजकर हिचे यश

दैनिक 'जनसत्य'च्या बातमीच्या सत्यतेवर शिक्कामोर्तब