बार्शी शहरात ६४ करोना पॉझिटिव्ह तर पंचेविस कंटेंटमेन्ट झोन
बार्शी शहरात ६४ करोना पॉझिटिव्ह तर पंचेविस कंटेंटमेन्ट झोनसात कंटेंटमेन्ट झोन रद्द

बार्शी : बार्शी शहरात जवळपास ६४ करोना पॉझिटिव्ह असून आज शहरातील विविध भागात तब्बल पंचेविस कंटेंटमेन्ट झोन आहेत आज गुरुवारी रात्री बार्शी तालुक्यातील एकूण१२ करोना अहवाल प्राप्त झाले आहेत यामध्ये शहरातील सात अहवाल आहेत त्यापैकी चार निगेटिव्ह आहेत तर सुभाष नगर,भवानी पेठ,तानाजी चौक, असे तीन अहवाल करोना पॉझिटिव्ह आहेत तसेच वैराग चे दोन, सासुरे एक,घाणेगाव एक असे चार अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत तर नागोबाची वाडी येथील एक अहवाल निगेटिव्ह आला आहे तसेच आज गुरुवारी बार्शी शहरातील २९ ,वैराग १ , साकत तीन ,मांडेगाव एक आणि भूम तालुक्यातील वांगी येथील एक असे एकूण ३५ स्वब तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत तर एकूण २१० अहवाल प्रलंबित आहेत अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ संतोष जोगदंड यांनी दिली आहे.अधिक माहिती अशी की शहरातील विविध भागात ३१ कंटेंटमेन्ट झोन करण्यात आले होते त्यापैकी वाणी प्लॉट, वायकुळे प्लॉट, बगळे बरड, गुंड प्लॉट, आर एस एम हाईट्स,हांडे गल्ली,कृष्णा कॉलनी असे सात कंटेंटमेन्ट झोन वगळण्यात आले आहेत तर आज शहरातील विविध भागात पंचेविस कंटेंटमेन्ट झोन म्हणून घोषित करण्यात आले आहेत तरी शहरातील नागरिकांनी महत्त्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडु नये तसेच घराबाहेर जाताना मास्क,सोशल डिस्टन्स, पाळावे गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.कंटेंटमेन्ट झोन घोषित झाल्यानंतर मुख्याधिकारी कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ विजय गोदेपुरे, प्रशासन अधिकारी शिवाजी कांबळे, मिळकत विभाग प्रमुख महादेव बोकेफोडे, तुषार खडके आप्पा राऊत,विजय मुळे आदी पथकाकडून पुढील कार्यवाही केली जात आहे
Comments
Post a Comment