धक्कादायक! करोना झाल्याचा संशय; तरुणीला धावत्या बसमधून फेकले


धक्कादायक! करोना झाल्याचा संशय; तरुणीला धावत्या बसमधून फेकले



rape News in Marathi, Latest rape news, photos, videos | Zee News ...


नवी दिल्ली: करोनानं देशभरात हाहाकार माजवला आहे. करोनाबाधित आणि मृत्यूचा आकडा दिवसागणिक वाढत आहे. करोनाचा लोकांनी धसका घेतला आहे. त्याच भीतीतून एका तरुणीला प्राण गमवावे लागले आहेत. करोनाबाधित असल्याच्या संशयातून बसचालक आणि कंडक्टरनं तरुणीला धावत्या बसमधून फेकून दिल्याची घटना नुकतीच घडली. यात गंभीर जखमी झाल्याने तिचा मृत्यू झाला.दिल्लीच्या मंडालवी परिसरात तरुणी राहत होती. करोनाबाधित असल्याच्या संशयातून बसचालक आणि कंडक्टरनं तिला मथुरा टोलनाक्याजवळ धावत्या बसमधून तिला फेकून दिले. 'मुलीची कोविड १९ चाचणी करण्यात आली होती. तिला दिल्लीतून पाठवण्यात आले होते. तिचा अहवाल निगेटिव्ह आला होता. मुलीला अशक्तपणा आला होता. त्यामुळं तिला चक्कर आली. ती नीट चालू शकत नव्हती. मात्र, ती करोनाबाधित असल्याचा संशय आल्यानं बसचालक आणि कंडक्टरनं तिला धावत्या बसमधून फेकले,' असा आरोप कुटुंबीयांनी केला.

मुलीला धावत्या बसमधून फेकले त्यावेळी तिच्या आईनं तिला वर ओढण्याचे प्रयत्न केले. मात्र, तिला वाचवू शकली नाही. मुलगी खाली पडली. तिच्या डोक्याला गंभीर जखम झाली. यात तिचा जागीच मृत्यू झाला. हा प्रकार घडत असताना बसमधील इतर प्रवाशांनी तिला वाचवण्याचा प्रयत्नही केला नाही, असा आरोप मुलीच्या आईनं केला आहे. या घटनेची मथुरा पोलीस चौकशी करत आहेत. तरुणीला कोणत्याही प्रकारची मारहाण झाली नाही, असं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. तर पीडित तरुणीला एका सामान्य प्रवाशाप्रमाणे उतरवण्यात आलं. कोणत्याही प्रकारची झटापट झाली नाही. तसे पुरावे मिळाले नाहीत. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येत आहे, असं पोलिसांनी सांगितलं.

पोलिसांच्या माहितीनुसार, घटनेनंतर पीडितेचे कुटुंबीय पोलीस ठाण्यात आले. त्यानंतर आम्ही जिल्हा रुग्णालयात मृतदेह विच्छेदनासाठी पाठवला. मुलीचा मृत्यू हृदयविकाराने झाल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळं याप्रकरणी कोणताही गुन्हा दाखल करता येणार नाही. करोना व्हायरसची सर्वत्र भीती आहे. त्यात या मुलीची प्रकृती बरी नव्हती. त्यामुळे बसचालक आणि कंडक्टरनं तिला टोल प्लाझाजवळ बसमधून खाली उतरवलं, असंही पोलिसांनी सांगितलं.
मुलीचे वडील सुशील कुमार हे प्रतापगंज येथे सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात. त्यांनी सांगितलं की, राजधानी दिल्लीत करोना रुग्णांचा आकडा वाढत आहे. त्यामुळं सुरक्षित राहावेत यासाठी आई आणि मुलीला गावी शिकोहाबाद येथे पाठवण्याचं ठरवलं होतं, असं सुशील कुमार यांनी सांगितलं. १५ जूनला दोघींनी नोएडा सेक्टर ३७ येथून दुपारी दोन वाजता बस पकडली. साधारण सव्वाचारच्या सुमारास फोन आला. १० वर्षीय मुलानं फोन उचलला. बहिणीचा मृत्यू झाला आहे असं समोरून सांगण्यात आलं.

Comments


Popular posts from this blog

कामाशिवाय घराबाहेर पडू नये

श्रीशा करंजकर हिचे यश

दैनिक 'जनसत्य'च्या बातमीच्या सत्यतेवर शिक्कामोर्तब