कोरोना झालेल्या व्यक्तीलाच लुटलं, रुग्णालयातून शिफ्ट करण्यासाठी घेतले तब्बल....!
कोरोना झालेल्या व्यक्तीलाच लुटलं, रुग्णालयातून शिफ्ट करण्यासाठी घेतले तब्बल....!

पुणे : कोरोना बाधित रुग्णाला एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात नेण्यासाठी पुण्यातील एका रुग्णवाहिकेने रुग्णाकडून तब्बल आठ हजार रुपये उकळल्याचा प्रकार समोर आला आहे. प्रकार उघडकीस आल्यानंतर संबंधित रुग्णवाहिकेच्या कंपनीवर बिबेवाडी पोलीस स्टेशनमध्ये फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोटार वाहन निरीक्षक धनंजय गोसावी (वय 41) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, पुण्यातील एका कोरोनाबाधित रुग्णाला एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात शिफ्ट करायचे होते. त्याकरिता नातेवाईकांनी संजीवनी सर्विसेस या कंपनीची रुग्णवाहिका मागवली होती. या रुग्णवाहिकेने सात किलोमीटर अंतरासाठी 900 रुपये घेणे अपेक्षित होते.
परंतु यांनी मात्र संबंधित व्यक्तीकडून तब्बल नऊ हजार रुपये उकळले. याबाबत नातेवाईकांनी जिल्हा प्रशासनाकडे तक्रार केली होती.या रुग्णवाहिकेची चौकशी करत असताना आरटीओकडे या गाडीची नोंदणी मोबाईल क्लीनिक व्हॅन अशी होती. परंतु प्रत्यक्षात तिचा वापर रुग्णवाहिका म्हणून केला जात होता. सर्व प्रकार उघडकीस आल्यानंतर आरटीओने संजीवनी ॲम्बुलन्स सर्व्हिसेस या कंपनी विरोधात तक्रार दिली त्यानुसार बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक लिट्टे करीत आहेत.
Comments
Post a Comment