‘वडिलांनीच साडीने घोटला आईचा गळा’, 10 वर्षाच्या मुलीने सांगितलं ‘त्या’ रात्री काय झालं
‘वडिलांनीच साडीने घोटला आईचा गळा’, 10 वर्षाच्या मुलीने सांगितलं ‘त्या’ रात्री काय झालं
इंदूर : नवरा बायकोची भांडणं ही तशी नवी नाहीत. संसारात अशी भांडणं होत असतात. मात्र याच भांडणांनी एका महिलेला आपला जीव गमवावा लागला. तु घर चालविण्यासाठी पैसे का आणत नाही असा तगादा नवरा लावत होता. त्यातून त्यांची भांडणं होत होती. अशाच एका भांडणानंतर नवऱ्याने बायकोची साडीने गळा घोटून हत्या केली. (Husband Killed wife) रात्री घडलेला हा सगळा प्रकार त्यांच्या 10 वर्षांच्या मुलीने (10 Years daughter) पाहिला. घाबरलेल्या मुलीने पोलिसांना (Police) जेव्हा ही घटना सांगितली तेव्हा त्यांनाही धक्का बसला. पत्नीवर अंत्यसंस्कार करून परत येत असतानाच पोलिसांनी त्या नराधमाला अटक केली.
मध्यप्रदेशातल्या इंदूरमधल्या ममता नगरमध्ये रिना आणि मनिष हे जोडपं राहतं. त्यांना 10 वर्षांची प्राची ही मुलगी आहे. मनिष हा नोकरी करतो. मात्र आपला सगळा पैसा दारूमध्ये वाया घालतो. त्यातून नवरा बायकोची कायम भांडणं होत असे. सगळे पैसे दारुत जात असल्याने मनिष हा बायकोला कमाई करून पैसे आणण्यास सांगत होता.
वडिल हे कायम आईला मारत असायचे. तुम्ही दारुमध्ये पैसे घालवता मग घर कसं चालणार असं आई कायम सांगत होती, असं त्या चिमुकल्या मुलीने सांगितलं. घटनेच्या दिवशीही दोघांमध्ये भांडण झालं होतं. रात्री जेव्हा त्या मुलीला जाग आली तेव्हा तिला तिचे वडिल हे आईच्या अंगावर बसून साडीने तिचा गळा आवळत असताना दिसले. तिचा ओरडण्याचा आवाज येऊ नये म्हणून नंतर त्याने उशीने तिच्या चेहेऱ्यावर दाबला, त्यामुळे गुदमरून तिचा मृत्यू झाल्याचं उघडकीस आलं.
मुलीने पुढे सांगितलं की, ही दोघांची नेहमीची भांडणं असतील म्हणून मी तशीच घाबरून झोपी गेले. नंतर सकाळी आईला उठवायला गेली तेव्हा ती काहीच बोलत नसल्याचं तिच्या लक्षात आलं. त्यानंतर तिने मामाला सगळा प्रकार सांगितला.
पोस्ट मार्टेम नंतर पोलिसांनाही संशय आला होता आणि त्यांनी जेव्हा मुलीला बोलतं केलं तेव्हा सगळा उलगडा झाला. त्याचवेळी अंत्यसंस्कार करून मनिष परत येत होता. तो पळून जाऊ नये म्हणून पोलिसांनी सापळा रचून अखेर त्याला अटक केली.
Comments
Post a Comment