जुलैमध्ये होणा-या NEET, JEE Main 2020 परीक्षा दोन महिन्यांनी पुढे ढकलल्या



जुलैमध्ये होणा-या NEET, JEE Main 2020 परीक्षा दोन महिन्यांनी पुढे ढकलल्या

सप्टेंबरमध्ये होणार परीक्षा, केंद्रीय मनुष्यबळ मंत्र्यांनी केली घोषणा

(संग्रहित छायाचित्र)

NEET व JEE Main परीक्षांना पुन्हा एकदा करोना संकटाचा फटका बसला आहे. केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयानं जुलै महिन्यात या परीक्षा घेण्याचा कार्यक्रम घोषित केला होता. मात्र, देशातील परिस्थितीत अजूनही सुधारणा होत नसल्यानं, त्याचबरोबर वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमी परीक्षा दोन महिन्यांनी पुढे ढकलण्याचा निर्णय केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयानं घेतला आहे.

ऐन परीक्षांच्या काळात करोनानं देशात शिरकाव केला. त्यामुळे शालेय परीक्षांपासून सर्व अभ्यासक्रमांच्या परीक्षांवर परिणाम झाला आहे. करोनामुळे यंदा जेईई व नीट या दोन्ही परीक्षाही लांबल्या आहेत. मे महिन्यामध्ये केंद्रीय मनुष्यबळ मंत्री रमेश पोखरियाल यांनी जुलैमध्ये दोन्ही परीक्षा घेण्याचा कार्यक्रम जाहीर केला होता. त्यासंदर्भातील वेळापत्रकही निश्चित करण्यात आलं होतं. मात्र, अजूनही परिस्थिती चिंताजनक असल्यानं दोन्ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

केंद्रीय मनुष्यबळ मंत्री पोखरियाल यांनी याची घोषणा केली. विद्यार्थ्यांची सुरक्षा व शैक्षणिक गुणवत्ता लक्षात घेऊन केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयानं दोन्ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. आता जेईईची मुख्य परीक्षा १ ते ६ सप्टेंबरच्या दरम्यान घेण्यात येईल. तर जेईई अॅडव्हॉन्स परीक्षा २७ सप्टेंबर आणि नीट परीक्षा ३१ सप्टेंबर रोजी घेण्यात येईल,” अशी माहिती पोखरियाल यांनी दिली.

१८ जुलैपासून होणार होत्या परीक्षा

जेईई मेन परीक्षा १८, २०, २१, २२ आणि २३ जुलैला घेण्यात येणार होती. त्यानंतर जेईई अॅडव्हान्सची परीक्षा ऑगस्टमध्ये होणार होती. याचबरोबर वैद्यकीय प्रवेशासाठीची प्रवेश पूर्व परीक्षा अर्थात NEET २६ जुलै रोजी घेण्यात येणार होती. मात्र, देशात करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती विद्यार्थ्यांच्या जिवाला करोनामुळे होणार संभाव्य धोका लक्षात घेऊन सरकारनं या परीक्षा दोन महिन्यांसाठी पुढे ढकलल्या आहेत.

Comments


Popular posts from this blog

कामाशिवाय घराबाहेर पडू नये

श्रीशा करंजकर हिचे यश

दैनिक 'जनसत्य'च्या बातमीच्या सत्यतेवर शिक्कामोर्तब