जादुटोण्याची धमकी देऊन पैसे उकळले



जादुटोण्याची धमकी देऊन पैसे उकळले

डोंबिवलीत रस्त्यालगत जादूटोण्याचे ...


पुणे: जादुटोणा करून कुटुंब उध्वस्त करण्याची धमकी देऊन सोमवार पेठेतील एका महिलेकडून १५ हजार रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात जादुटोणा विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत एका ३८ वर्षीय महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार सुनिता पवनळे उर्फ सोनी व इतर दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्ररादार यांच्या मुलाने सोन्याचे दागिने त्याच्या मित्रांना दिले आहेत. ते दागिने परत मिळत नव्हते. या दरम्यान तक्रारदार यांची काही ओळखीच्या व्यक्तींमार्फत आरोपींशी ओळख झाली. आरोपींनी तक्रारदार यांना देवीची पूजा करून प्रसन्न केल्यानंतर दागिने परत मिळतील, असे सांगितले. त्यानंतर आरोपींनी महिलेला धमकावण्यास सुरुवात केली. जादुटोणा करून महिलेचे कुटुंब उध्वस्त करण्याची धमकी देऊन त्यांच्याकडून वेळोवेळी १५ हजार रूपये घेतले. या त्रासाला कंटाळून महिलेने समर्थ पोलिसांकडे तक्रार दिली. या प्रकरणी समर्थ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Comments


Popular posts from this blog

कामाशिवाय घराबाहेर पडू नये

श्रीशा करंजकर हिचे यश

दैनिक 'जनसत्य'च्या बातमीच्या सत्यतेवर शिक्कामोर्तब