“मला नेण्यासाठी येऊ शकता का?”, चालता चालता प्राण गमावण्यापूर्वी त्याने कुटुंबाला विचारला शेवटचा प्रश्न
“मला नेण्यासाठी येऊ शकता का?”, चालता चालता प्राण गमावण्यापूर्वी त्याने कुटुंबाला विचारला शेवटचा प्रश्न करोनामुळे संपूर्ण देशभरात लॉकडाउन घोषित झाला आणि अनेक कामगार आपल्या घराच्या दिशेने चालू लागले करोनामुळे संपूर्ण देशभरात लॉकडाउन घोषित झाला आणि अनेक कामगार आपल्या घराच्या दिशेने चालू लागले. वाहतुकीचं कोणतंही साधन उपलब्ध नसल्याने अनेकांनी चालत जाण्याचा निर्णय घेतला. ३०० ते ५०० किमी अंतर चालत पार करत आपल्या घऱी सुखरुप पोहोचण्यासाठी अनेकांची धडपड सुरु आहे. पण यामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागत आहेत. अशीच एक ह्रदयद्रावक घटना समोर आली आहे. ३८ वर्षीय रणवीस सिंह मध्य प्रदेशातील आपल्या घरी पोहोचण्यासाठी चालत निघाले होते. पण रस्त्यातच आग्रा येथे ह्रदयविकाराच झटका आला आणि त्यांना आपले प्राण गमवावे लागले. आपल्या कुटुंबाशी त्यांचं शेवटचं बोलणं झालं तेव्हा त्यांच्या तोंडी वाक्य होतं, “शक्य असेल तर मला घेऊन जाण्यासाठी या”. रणवीर सिंह आपल्या घरापासून १०० किमी अंतर दूर होते. पण सतत चालण्यामुळे त्यांना थकवा आला होता. यामुळे ते जमिनीवर कोसळले. अखेर ह्रदयविकाराच्या झटक्याने...