प्रशासन झाले खडबडून जागे
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस किरण साठे यांच्या मागणीने
प्रशासन झाले खडबडून जागे
माळीनग र(प्रतिनिधी) : माळशिरस तालुक्यातील ज्या रुग्णालयाने विभागीय आयुक्त पुणे,व सोलापूर जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवून रुग्णालये बंद ठेवली आहेत,त्या रुग्णालयाचे चालक यांच्यावर त्वरित कारवाई करून त्यांची नोंदणी कायमची रद्द करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस किरण साठे यांनी उपविभागीय अधिकारी माळशिरस विभाग अकलूज यांना दिनांक २८/३/२०२ रोजी दिले होते.त्यामुळे माळशिरस तालुक्यातील प्रशासन खडबडून जागे झाले.
देशासह महाराष्ट्र राज्यामध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन केल्याने सर्वसामान्य माणूस घरामध्येच बसून असताना या सर्वसामान्य माणसाला कोरोना ची लक्षणे सोडून इतर आजारासाठी दवाखान्यात जाणे आवश्यक आहे,मात्र माळशिरस तालुक्यातील सर्व खेड्या गावातील,शहरातील खाजगी दवाखाने बंद करण्यात आले आहेत असे निवेदनात म्हटले होते.
त्याच मागणीला अनुसरून दिनांक२९/३/२०२० माळशिरस तहसीलदार यांनी प्रत्येक गावातील ग्रामस्तरीय समितीला त्यांच्या गावामध्ये असलेल्या खाजगी दवाखान्यांनी कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव होण्यापूर्वी चालू असलेले व कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव झाल्यानंतर वैद्यकीय सेवा देणेस/पूरविणेस टाळाटाळ केली त्याबाबत ची माहिती देण्याचे आदेश दिले आहेत.
विभागीय आयुक्त व सोलापूर जिल्हा अधिकारी यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवूण माळशिरस तालुक्यातील रुग्णालय बंद ठेवणाऱ्यावर कारवाई करावी व त्यांची नोंदणी कायमची रद्द करावी या माझ्या मागणीची प्रशासनाने दखल घेतली असून संबंधित गावातील बंद असलेल्या रुग्णालयाची तक्रार ग्रामस्थांनी आपल्या गावातील ग्रामस्तरीय समितीकडे करून त्या बंद रुग्णालयाकडे ग्रामस्तरीय समितीचे लक्ष वेधून त्याच्यावर कारवाई करण्यास भाग पडावे असे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस किरण साठे यांनी सांगितले.
Comments
Post a Comment