पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांचे सुधारीत आदेश जारी

पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांचे सुधारीत आदेश जारी
सोलापूर  : कोरोना विषाणूबाबत गैरसमज पसरविणारी माहिती कोणत्याही माध्यमातून प्रसारीत केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा  पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यानी  दिला आहे. याबाबत त्यांनी काल फौजदारी दंड प्रक्रिया संहिता 1973 च्या 144 (1) व (3) नुसार सुधारीत आदेश जारी केले आहेत. या आदेशात नमूद केले आहे की, संचार बंदी कालावधीत  लिखित, डिजीटल  मिडीयामध्ये  छपाई करुन किंवा तोंडी  मजकुर प्रसारीत करेल किंवा चित्र छापेल, ज्यामुळे  लोकांमध्ये गैरसमज निर्माण होऊ शकतो, अफवा पसरविल्या जाऊ शकतात अशा कृत्यास बंदी घालण्यात आली आहे. वरील आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती, संस्था अथवा संघटना भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) कलम 188 मधील तरतुदीनुसार दंडनीय/कायदेशीर कारवाईस पात्र ठरेल अशा व्यक्ती, संस्था अथवा संघटना यांच्या विरुध्द संबंधित पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांनी कारवाई करावी, असेही आदेशात नमूद केले आहे. 

Comments


Popular posts from this blog

कामाशिवाय घराबाहेर पडू नये

श्रीशा करंजकर हिचे यश

दैनिक 'जनसत्य'च्या बातमीच्या सत्यतेवर शिक्कामोर्तब