विरवडे ग्रामपंचायतीच्या वतीने कर्मचार्यांना मास्क वाटप
विरवडे ग्रामपंचायतीच्या वतीने कर्मचार्यांना मास्क वाटप
नागरिकांनी योग्य ती काळजी घ्या -नवनाथ अवताडे
मोहोळ,(तालुका प्रतिनिधी): विरवडे बु.(ता.मोहोळ) येथे ग्रामपंचायत च्या वतीनेनागरीकामध्ये मिसळून कोरोना संसर्गाच्या बाबतीत महत्वाच्या कामाची जबाबदारी पार पाडणारे आरोग्य सेविका,आशा वर्कर,अंगणवाडी सेविका यांना मास्क व सॅनिटायझर चे वाटप करण्यात आले.
विरवडे बू ग्रामपंचायत च्या वतीने कोरोना च्या पार्श्वभूमीवर विविध खबरदारी घेण्यात येत असून पुणे - मुंबई येथे वास्तव्यास असलेल्या आणि कोरोना मुळे जी लोक गावात रहायला आली आहेत, त्यांनी बाहेर फिरु नये, इतरांच्या संपर्कात येऊ नये म्हणून ग्रामपंचायत च्या वतीने त्यांची घरोघरी जाऊन आरोग्याची विचारपुस करून नोटीस देण्यात आली. तसेच तपासण्यासाठी जाण्यासाठी आग्रह धरण्यात आला.
यावेळी ग्रामसेविका काळे मॅडम,सरपंच प्रभुराम अवताडे, उपसरपंच दिनकर बापु पवार, गावकामगार तलाठी राठोड,पोलिस पाटील वसंत पाटील,नवनाथ अवताडे,श्रीधर पाटील,प्रमोद अवताडे,आण्णा कांबळे,मनोज कांबळे आदि उपस्थित होते.
.........................................................
कोरोना बाबत शासनाने वेळोवेळी आदेश प्रत्येक नागरिकाने पाळावेत.लॉकडाउन किंवा संचारबंदी पाळण्याकडे लोकांचा कल दिसून येत आहे. परंतु अजूनही कोरोना बाबतीत ग्रामीण भागातील जनता सिरीयस झाल्याचे दिसून येत नाही. घराच्या बाहेर पडणे,विनाकारण फिरणे, चारचौघात गप्पा मारत बसणे, यामुळे कोरोना वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे प्रत्येकांनी "बचेंगे तो और भी लढेंगे" या उक्तीप्रमाणे राहून कोरोना च्या लढाईमध्ये यशस्वी होण्यासाठी आपला सहभाग नोंदवण्याची आवश्यकता आहे.
नवनाथ अवताडे
सामाजिक कार्यकर्ते,(विरवडे बु.)
..............................................................................
Comments
Post a Comment