ज्युनियर वकीलांना पाच हजारांची मदत द्या : ॲड मंजुनाथ कक्कळमेली



ज्युनियर वकीलांना पाच हजारांची मदत द्या  : ॲड मंजुनाथ कक्कळमेली
सोलापूर (प्रतिनिधी) :  ज्युनिअर वकिलांना पाच हजारांची आर्थिक  मदत द्या अशी मागणी  ॲड मंजुनाथ कक्कळमेली यांनी  एका पत्राद्वारे सरकराकडे केली  आहे
 संपूर्ण देशात कोरोनावर नियंत्रण  ठेवण्यासाठी लाँकडाऊनची घोषणा झाली  आहे ,यामुळे भारत सरकार व राज्य सरकार जनतेच्या हालअपेष्ठा कमी व्हावे  यासाठी वेगवेगळे अनुदान  घोषित करीत आहेत परंतु यामध्ये अजून एक वर्ग होरपळून निघत आहे तो म्हणजे  ज्युनिअर वकील वर्ग होय.
नुकतेच वकीलीची पदवी घेऊन वकीलीला सुरुवात करणारे ज्युनियर वकीलांची  कोरोना लाँकडाऊनमुळे उपासमार  होत आहे.त्यातच कोरोना मुळे कोर्ट कचेरी बंद असल्याने  वकीली व्यवसायावर परिणाम होत असल्याचे चित्र  दिसून येत आहेत .
ज्युनिअर वकिलांची होणारी  उपासमार लक्षात घेऊन ॲड.के. मंजुनाथ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, बार काँन्सिल ऑफ इंडिया. आणि  बार का़ँन्सिल ऑफ महाराष्ट्र याना पत्र लिहून ७ वर्षा पेक्षा कमी वकील व्यवसायचे अनुभव असणाऱ्यां वकीलांना आर्थिक मदत म्हणून  पाच हजार  रुपये अनुदान प्राप्त  करुन देण्यासाठी  हालचाली  कराव्यात.
ज्युनिअर वकीलांची उपासमार  लक्षात घेऊन भारत सरकार  आणि  राज्य  सरकार त्वरीत आर्थिक  मदत द्यावी अशी मागणीही ॲड मंजूनाथ कक्कळमेली यांनी एका  पत्राद्वारे केली  आहे

Comments


Popular posts from this blog

कामाशिवाय घराबाहेर पडू नये

श्रीशा करंजकर हिचे यश

दैनिक 'जनसत्य'च्या बातमीच्या सत्यतेवर शिक्कामोर्तब