पोलिसांवर केली जमावांनी दगडफेक

अतिउत्साह तरुणांनी मोडला जमावबंदीचा आदेश;
 पोलिसांवर केली जमावांनी दगडफेक
अक्कलकोट शहर प्रतिनिधी : वागदरी येथील श्री परमेश्वर रथोत्सव रद्द करण्याचा निर्णय झाला असताना काही अतिउत्साही तरूणांनी नियम डावलून आज रविवारी रथोत्सव काढला. याचदरम्यान पोलिसावर दगडफेक केल्यामुळे वागदरी येथील वातावरण तणावपूर्ण आहे. रात्री उशिरा पर्यंत अक्कलकोट उत्तर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
वागदरी (ता.अक्कलकोट) येथील परमेश्वर यात्रा २५ मार्च रोजी होती. देशात कोरोनो आजाराने थैमान घातले आहे. त्यामुळे जमावबंदीचा आदेश असल्यामुळे यात्रा रद्द करण्यात आली होती. परंपरेप्रमाणे पंच कमिटीच्या वतीने दोघांनी आज शनिवारी पूजा करण्याचे ठरले होते.
पूजा चालू असताना जवळपास शंभर अतिउत्साही तरूण जमा होऊन त्यांनी रथ ओडण्यास प्रारंभ केला. संचारबंदी असताना जमाव जमा झाल्याने पोलिसानी रथयाञा रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी रथ रोखल्याने चिडलेल्या तरुणांनी पोलिसांवर दगडफेक केली. परिस्थिती हाताबाहेर जात असल्यामुळे पोलिसांनी सावध पवित्रा घेतले.

Comments


Popular posts from this blog

कामाशिवाय घराबाहेर पडू नये

श्रीशा करंजकर हिचे यश

दैनिक 'जनसत्य'च्या बातमीच्या सत्यतेवर शिक्कामोर्तब