मोहोळ शहरांमध्ये स्वखर्चाने औषध फवारणी

नगरसेवक प्रमोद डोके व नगरसेवक सत्यवान देशमुख यांच्या वतीने

मोहोळ  शहरांमध्ये स्वखर्चाने औषध फवारणी

एक एप्रिल रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन

मोहोळ,(तालुका प्रतिनिधी):मोहोळ शहरांमधील नगरसेवक असणारे प्रमोद डोके व सत्यवान देशमुख यांच्या मार्फ़त विविध सामाजिक उपक्रम वेळोवेळी राबवले जातात.यावेळीकोरोना च्या पार्श्वभूमीवर मोहोळ शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नगर परिषदेचे गटनेते प्रमोद डोके व शिवसेनेचे नगरसेवक सत्यवान देशमुख यांच्यावतीने औषध फवारणी करण्यात आली.कोरोना विषाणूच्या फैलावणे संपूर्ण देश हादरून गेला आहे,या पाश्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी,मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,आरोग्य विभाग,गृहविभाग अन्य यंत्रणा हा महाभयंकर कोरोना विषाणू आपल्या राज्यातून हद्दपार घालवण्याचा यशस्वी प्रयत्न करीत असताना हे एकट्या शासनाचे काम नसून भयभीत झालेल्या मोहोळ शहरातील नागरिकांना धीर देण्यासाठी या कोरोना विषाणू विरोधात आपणही लढाई लढली पाहिजे आणि ते आपल्या गावासाठी कर्तव्य ही आहे म्हणून नगरसेवक प्रमोद डोके तसेच नगरसेवक सत्यवान देशमुख यांनी ब्लोअर मशीन ने संपूर्ण मोहोळ शहरा मधून औषध फवारनी केली.यामध्ये आपापल्या वॉर्डा सह सार्वजनिक ठिकाणासह मोहोळ बस स्थानक,मोहोळ तहसील,मोहोळ पंचायत समिती, मोहोळ नगर परिषद आवार,ग्रामीण रुग्णालय, आठवडी बाजार व शहराचा मुख्य रस्ता व शहरातील काही वार्ड फवारण्यात आले.शासनाने सांगितलेल्या सोडियम हायपो क्लोराइड या कीटकनाशक औषधाने फवारणी करण्यात आली.

...........................................................................................................................


गेल्या अनेक वर्षापासून मी विविध सामाजिक संघटना च्या माध्यमातून शहरांमध्ये अनेक सामाजिक उपक्रम राबवत आहे.कोरोना च्या यामुळे शहरातील जनतेला सहकार्य म्हणून जंतुनाशक औषध फवारणी करण्यात आली आहे.त्याच पद्धतीने सध्या रुग्णांना रक्ताचा तुटवडा पाहता टप्प्याटप्प्याने सोशल डिस्टन्स पाळत १ एप्रिल रोजी मोहोळ येथील शहाजीराव पाटील सभागृहात क्रमाक्रमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोहोळ शहरातील कोणत्याही नागरिकाला अडचण आल्यास त्यांनी माझ्याकडे संपर्क करावा अडचण दूर करण्यासाठी सहकार्य केले जाईल.

प्रमोद डोके
नगरसेवक,मोहोळ नगर परिषद
..............................................................................................................................................................


मोहोळ शहरामध्ये शिवसेनेच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. सध्या कोरोना चे संकट संपूर्ण जगावर थैमान घालत असताना  नागरिकांसाठी योग्य ती खबरदारी घेत असून औषध फवारणी या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केला आहे.संसर्गजन्य विषाणूचा सामना करण्यासाठी मोहोळ शहर ट्रॅक्टर वरील ब्लोअर मशीन ने औषध फवारणी चा उपक्रम हाती घेतला आहे.

सत्यवान देशमुख
नगरसेवक,नगरपरिषद मोहोळ



Comments


Popular posts from this blog

कामाशिवाय घराबाहेर पडू नये

श्रीशा करंजकर हिचे यश

दैनिक 'जनसत्य'च्या बातमीच्या सत्यतेवर शिक्कामोर्तब