भाजी मार्केट सह प्रा .आ .केंद्रात सोशल डिस्टन्स ची काळजी ...
भाजी मार्केट सह प्रा .आ .केंद्रात सोशल डिस्टन्स ची काळजी
वैराग (प्रतिनिधी) : कोरोना विषाणूचा विळखा हळूहळू वाढत असताना प्रशासनाने केलेल्या अहवानाला प्रतिसाद देत कोरोना ला हरवण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात आलेल्या सर्व रुग्णांची तपासणी करत असताना दोन दोन रुग्णांमध्ये सोशल डिस्टन्स ठेवण्याची काळजी प्राथमिक आरोग्य केंद्राने घेतली जात असून भाजी मार्केट मध्ये सुद्धा पोलिस प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली सोशल डिस्टन्स पाळला जात आहे.
एकीकडे महाराष्ट्रासह देशातील कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या हळूहळू वाढत आहे. ग्रामीण भागात या विषाणूने पाय पसरू नयेत म्हणून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. दोन व्यक्तींमधील अंतर कमीत कमी तीन फूट असावे याच प्रशासनाच्या आदेशाला हो देत वैराग मधील प्राथमिक केंद्रात येणाऱ्या दोन रुग्णांन मध्ये योग्य ते अंतर ठेवण्यात येत आहे .तसेच पहिल्या दोन दिवशी भाजी खरेदीसाठी झालेली नागरिकांची झुंबड पाहता वैराग पोलिसांच्यावतीने भाजी विक्रेत्यांना योग्य ती मार्गदर्शक तत्त्वे सांगून की अमलात आणण्याचे काम केले आहे. भाजी खरेदी करीत असताना दोन भाजीविक्रेते व खरेदी करणारे ग्राहक यांच्यात योग्य अंतर ठेवण्यात आले असून योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे.
महाराष्ट्रात कोरोना रुग्णाची संख्या हळूहळू वाढत आहे. याचा फटका ग्रामीण भागाला बसू नये म्हणून संबंधित ग्रामपंचायत व पोलीस प्रशासन वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली योग्य ती खबरदारी घेत आहेत .शासनाच्या, ग्रामपंचायतीच्या व पोलिस प्रशासनाच्या अह वानाला नागरिक आता योग्य प्रतिसाद देताना दिसत आहेत.
आगामी काळात अशीच खबरदारी घेतल्यास कोरोनाला नक्कीच हरविण्यासाठी यश येणार आहे .एवढ्यावरच न थांबता नागरिकांनी विनाकारण घराच्या बाहेर पडू नये .सर्व प्रकारच्या सुविधा घरपोच मिळण्यासाठी ग्रामपंचायत व पोलीस प्रशासन यांनी विविध प्रकारच्या वस्तू विक्री विक्रेत्यांचे ऑनलाईन नंबर सोशल मीडियावर शेअर केलेले आहेत. या माध्यमातून जनतेने विक्रेत्या ना फोन करून घरपोच सेवेचा लाभ घ्यावा व आपली व आपल्या कुटुंबीयांची काळजी घ्यावी असे आवाहन ग्रामपंचायत व पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे .
Comments
Post a Comment