नवयुग समाजसेवी संस्था मोहोळच्या वतीने कामगारांना जीवनाश्यक वस्तू वाटप
नवयुग समाजसेवी संस्था मोहोळच्या वतीने
कामगारांना जीवनाश्यक वस्तू वाटप
मोहोळ : कोरोना प्रादूर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण जिल्ह्याच्या सीमा बंद करण्यात आले आहे. तसेच जिल्ह्याच्या सीमाही बंद आहे. या काळात गोर गरीबांचे हाल होवू नये कुणीही अन्नधान्या वाचून अडचणीत येवू नये त्यांचेवर उपासमारीची वेळ येऊ नये यासाठी नवयुग बहुउद्देशिय समाजसेवी संस्था मोहोळच्या वतीने परप्रांतीय मजूर , कामगारांना जीवनाश्यक वस्तू देण्यात येत आहेत. नवयुग समाजसेवी संस्थेची टिम अध्यक्ष तथा दै.जनसत्यचे रमजान तांबोळी यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचे सचिव तथा पत्रकार राजन घाडगे, गणेश ढाणके, अनंत तेली, प्रविण गोटे, डॉ. रिजवान शेख, संतोष पोतदार, अंकुश जानकर, प्रशांत झाडे, राजाभाऊ रसाळ, यशोदा कांबळे, रशीदा शेख आदि पदाधिकारी राष्ट्रीय आपत्कालीन परिस्थितीत जीवनावश्यक वस्तू देणेचे मदत कार्य करीत आसताना पहावयास मिळत आहे. कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे जीवनावश्यक वस्तूचे दुकाने उघडी असली तरी हाताला काम नसल्याने गोरगरीबांवर उपासमारीची वेळ येत असल्याचे नवयुग समाजसेवी संस्थाच्या पदाधिकारी यांचे निदर्शनांस आल्याने क्षणांचा विलंब न लावता आर्थिक मदत उभी करीत गहु, तांदुळ, तेल, दाळी, साखर, शेंगदाने, साबण, मीठ व इतर आवश्यक लागणारे वस्तू ते नागरिक राहत असलेल्या ठिकाणी जाऊन पोहच करीत आहे. नवयुग संस्थेच्या या अनोख्या राष्ट्रीय आपत्कालीन परिस्थितीत मदत कार्याकार्याची सोशिल मिडियांतून कौतूक केले जात आहे.
राष्ट्रीय आपत्कालीन परिस्थिती असो अथवा सर्वसामान्य गरजूना काहीही समस्या उद्भभवू अशा असंख्य समस्यांना मदत करणे करीता नवयुग संस्थेची स्थापना केलेली आहे हे कार्य पदाधिकाऱ्यांना घेऊन सदैव करणेस कटिबद्ध आहोत.... रमजान तांबोळी, अध्यक्ष नवयुग समाजसेवी संस्था, मोहोळ.
Comments
Post a Comment